वीर स्मारकाची कचराकुंडी

By admin | Published: November 11, 2014 12:29 AM2014-11-11T00:29:01+5:302014-11-11T00:29:01+5:30

पहिल्या महायुद्धामध्ये ब्रिटिश सत्तेच्या बाजूने युद्धात सहभागी झालेल्या पुणो शहर आणि जिल्ह्यातील वीर सैनिकांच्या स्मृतिप्रीत्यर्थ उभारण्यात आलेल्या स्मारकाची अक्षरश: कचराकुंडी झाली आहे.

Veer memorial trash | वीर स्मारकाची कचराकुंडी

वीर स्मारकाची कचराकुंडी

Next
पुणो : पहिल्या महायुद्धामध्ये ब्रिटिश सत्तेच्या बाजूने युद्धात सहभागी झालेल्या पुणो शहर आणि जिल्ह्यातील वीर सैनिकांच्या स्मृतिप्रीत्यर्थ उभारण्यात आलेल्या स्मारकाची अक्षरश: कचराकुंडी झाली आहे. जिल्हाधिकारी कार्यालय, बंडगार्डन पोलीस ठाणो, ससून रुग्णालय आणि जिल्हा परिषदेच्या जुन्या इमारतीच्या बरोबर मधल्या चौकात असलेले हे स्मारक मद्यपींचा अड्डा बनले आहे. ज्या वीरांच्या सन्मानार्थ हे स्मारक उभारण्यात आले त्यांच्या नावांचे फलकही ऊन, वारा, पावसात खराब झाले आहेत.
बंडगार्डन पोलीस ठाण्याच्या अगदी समोरच हे स्मारक आहे. साधारणपणो वीस फुटांच्या व्यासामध्ये वर्तुळाकार आकाराचे हे स्मारक आहे. या स्मारकामध्ये आकर्षक असा स्मृतिस्तंभ आहे. ‘1914-19च्या महायुद्धात साम्राज्यासाठी लढण्यास पुणो शहर व जिल्ह्यामधून रणांगणावर गेलेल्या सर्व जातींच्या व सर्व धर्माच्या 
वीरमर्द गडय़ांच्या चिरस्मरणार्थ हे स्मारक सार्वजनिक वर्गणीने उभारले, अशी अक्षरे या स्मृतिस्तंभावर कोरण्यात आलेली आहे. रस्त्याच्या समतल भागापेक्षा साधारणपणो पाच फूट खाली खड्डय़ामध्ये हे स्मारक आहे.
पहिल्या जागतिक महायुद्धावेळी भारतावर ब्रिटिश सत्तेचा अंमल होता. ब्रिटिश लष्करामध्ये सहभागी होऊन युद्धामध्ये सहभागी झालेल्या सैनिकांची आणि लष्करी अधिका:यांची नावे या स्मारकामध्ये लावण्यात आलेली आहेत. साम्राज्यासाठी लढणा:या वीरांचा यथोचित सन्मान करण्यासाठी उभारण्यात आलेल्या या स्मारकाला सध्या धूळ आणि घाणीने घेरले आहे. पोलीस ठाण्यासमोरच असलेल्या या स्मारकाकडे पोलिसांचेही लक्ष नसते. रात्री-बेरात्री या स्मारकाच्या पाय:यांवर बसून मद्यपींचा अड्डा रंगतो. वास्तविक हे स्मारक नेमके कशाचे आहे, याची माहिती अगदी मोजक्याच लोकांना आहे. स्मारकासमोर असलेल्या छोटय़ा जागेत बाग फुलवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. परंतु, तेथेही पालिकेचे कर्मचारी कचरा जाळतात. त्यामुळे बागेतील एका झाडाचे खोड आणि पाने जळून 
गेली आहेत. 
लष्करात काम करणा:या सैनिक, त्यांचा त्याग व बलिदान याबद्दलची उदासीन वृत्ती या स्मारकाकडे पाहिल्यावर प्रकर्षाने जाणवत आहे. (प्रतिनिधी)
 
प्रेमवीरांनी कोरली नावे
स्मारकाच्या संरक्षक भिंतीच्या फरशा गळून पडल्या आहेत. काही प्रेमवीरांनी चुन्याने आपली नावे या भिंतींवर रंगवलेली आहेत. यासोबतच स्मृतिस्तंभावरची वीरश्रीची द्योतक असलेली ढाल-तलवारीची 
धातूची चिन्हेच चोरटय़ांनी तोडून 
चोरून नेली आहेत. स्तंभावरील  ‘चिरंजीव त्यांचे जगी नाव राही’ अशा अक्षरांमधील बरीचशी अक्षरे पुसली गेलेली आहेत. स्तंभावरील अनेक ठिकाणचा भाग तुटून पडलेला आहे. 
 
4स्मारकाभोवती ब्रिटिशकालीन दिव्यांच्या खांबांप्रमाणो आकर्षक वीज दिवे लावण्यात 
आले होते. सध्या या स्मारकातील एकही दिवा 
पेटत नाही. 
4विजेचे कनेक्शनच गायब झाल्यासारखी 
परिस्थिती आहे. चोरटय़ांनी तर खांबावरील दिवेच लंपास केले आहेत. हे कमी म्हणून की 
काय, झाडाच्या फाद्यांना दारूच्या बाटल्या लटकवण्यात आलेल्या आहेत. 
 
कर्नल पी. बी. गोळे
कॅप्टन अमित वर्मा
कॅप्टन नितीन चव्हाण
लान्सनायक शंकर राजाराम शिंदे
शिपाई वजीर दत्तात्रय रास्ते
शिपाई संभाजी लक्ष्मण शिळीमकर
फ्लाईट लेफ्टनंट प्रदीप विनायक आपटे
नायक पांडुरंग कांबळे
शिपाई विलास बाजीराव मुळूक
शिपाई गुलाबराव थोरात
शिपाई ज्ञानदेव लक्ष्मण पवार
शिपाई मारुती माने
शिपाई शिवाजी भिकोबा भोईटे
शिपाई सोपान वाखारे
शिपाई गोविंद मासळकर
लान्सनायक दादा नामदेव जाधव
शिपाई रमेश बबन शिंदे
नायब सुभेदार सुरेश दशरथ चौधरी
शिपाई नितीन मारुती पवळे
शिपाई प्रदीपकु मार उमाकांत शेळे
शिपाई रमेश गाडेकर
शिपाई सागर राजेश कृष्णा
हवालदार नाले लाला भीमराव
शिपाई जयदीप नारायण गाढवे
शिपाई राजाराम लक्ष्मण पोटफोडे
हवालदार शंकर पवार
नायब सुभेदार मधुकर भालेकर
नायब सुभेदार अश्रू सोपान दाम
हवालदार राजाराम मोरे
नायक मारुती भूमकर
नायक रामदास गोगावले
नायब सुभेदार माधवराव जगताप
नायक पंढरीनाथ गोरे
लान्सनायक सखाराम जाधव
शिपाई भाऊ भिंगारदिवे
शिपाई सीताराम जमल
नायब सुभेदार दत्तू शिवले
नायब सुभेदार जगन्नाथ सांगळे
शिपाई बबन जठार
शिपाई लक्ष्मण पाटील
स्क्वॉड्रन लिडर दीपक यादव
नायब सुभेदार तुकाराम निवृत्ती बनसोडे
शिपाई मिलिंद कांबळे
नायक राजेंद्र सावंत
लान्सनायक पांडुरंग मोरे
शिपाई अशोक शितोळे
शिपाई मारुती कांबळे
शिपाई नामदेव बोराटे
शिपाई दत्तात्रय मोरे
शिपारी रामचंद्र म्हस्के
 
1स्मारकाच्या पाय:या उतरतानाच उत्तर आणि दक्षिण बाजूला कच:याचे ढीग लागलेले पाहायला मिळतात. या कच:यामध्ये आजूबाजूला असलेल्या 
चहाच्या टप:यांवरील कचरा, प्लॅस्टिकचे चहाचे कप आणि रिक्षाचे हुड, जुने कपडे पडलेले आहेत. 
2रस्ता झाडल्यानंतर जमा झालेला कचराही याच स्मारकामध्ये टाकण्यात येत आहे. त्यामुळे स्मारकाची अवस्था कचरापेटीप्रमाणो झाली आहे.
 
3संरक्षक भिंत फोडून पाण्याचा नळ घेण्यात आलेला आहे. तुटलेल्या या नळामधून कायम पाणी गळत असते. आजूबाजूच्या खाद्यपदार्थाच्या स्टॉल्सवर येथूनच पाणी भरुन नेले जाते. 
4टप:यांवरच्या चहासाठीही हेच पाणी वापरले जाते आणि नंतर चहाचे खरकटे कप येथे आणून टाकले जातात. जमा झालेला कचरा स्मारकाच्या एका कोप:यातच जाळला जातो. त्यामुळे भिंती धुराने काळ्या झाल्या आहेत.

 

Web Title: Veer memorial trash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.