भाज्या-फळे येणार आता थेट दारात!

By admin | Published: June 29, 2016 05:24 AM2016-06-29T05:24:12+5:302016-06-29T05:24:12+5:30

बाजार समित्यांचा अडसर दूर सारून शेतकऱ्यांनी पिकविलेला फळे-भाजीपाला आता ग्राहकांच्या दारात थेट विक्री करण्यास मंत्रिमंडळाने आज मान्यता दिली

Vegetable-fruits will now come directly to the door! | भाज्या-फळे येणार आता थेट दारात!

भाज्या-फळे येणार आता थेट दारात!

Next


मुंबई : बाजार समित्यांचा अडसर दूर सारून शेतकऱ्यांनी पिकविलेला फळे-भाजीपाला आता ग्राहकांच्या दारात थेट विक्री करण्यास मंत्रिमंडळाने आज मान्यता दिली असून, यासाठी सध्याच्या पणन कायद्यात बदल करण्यास तत्त्वत: मंजुरी देण्यात आली आहे.
महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम १९६३मध्ये सुधारणा केल्यामुळे शेतकऱ्यांना फळे व भाजीपाला विक्रीसाठी आश्वासित, विश्वासार्ह व स्पर्धात्मक बाजारपेठेचे पर्याय खुले होणार असून, त्यांच्या मालाला योग्य भाव मिळण्यास मदत होणार आहे. यासाठी या अधिनियमाच्या कलम २, ६, २९ व ३१मध्ये सुधारणा करण्यात येणार आहे. या सुधारणेमुळे मार्केटची व्याख्याही सुधारित होणार असून, यामुळे शेतकऱ्यांचे व्यापक हित साधण्यास मदत होणार असल्याचे सहकार व पणन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
या अधिनियमात सुधारणा करण्यापूर्वी यासंबंधित सर्व घटकांशी चर्चा करण्यात येणार असून, त्यांच्या हरकती व सूचनांवर विचारविनिमय करण्यासाठी पणनमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उपसमिती गठीत करण्यात आली आहे. या समितीत वित्तमंत्री
सुधीर मुनगंटीवार, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, उद्योगमंत्री सुभाष देसाई, कृषी राज्यमंत्री प्रा. राम शिंदे, उद्योग राज्यमंत्री प्रवीण पोटे-पाटील, जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे, सहकार राज्यमंत्री दादा भुसे हे सदस्य म्हणून राहणार आहेत. (विशेष प्रतिनिधी)

Web Title: Vegetable-fruits will now come directly to the door!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.