भाजीपाला दूधकोंडी

By admin | Published: June 3, 2017 02:09 AM2017-06-03T02:09:06+5:302017-06-03T02:09:06+5:30

शेतकरी संपामुळे पिशवीबंद दूध पुरवठा निम्म्याने घटल्याने पुणे शहरात शुक्रवारी दूधकोंडीची स्थिती निर्माण झाली. शनिवारपासून

Vegetable milkkondi | भाजीपाला दूधकोंडी

भाजीपाला दूधकोंडी

Next

पुणे : शेतकरी संपामुळे पिशवीबंद दूध पुरवठा निम्म्याने घटल्याने पुणे शहरात शुक्रवारी दूधकोंडीची स्थिती निर्माण झाली. शनिवारपासून दूधटंचाईची तीव्रता आणखी वाढले असा अंदाज शहरातील प्रमुख दूध वितरकांनी व्यक्त केला.
शेतकऱ्यांच्या ठिकठिकाणच्या आंदोलनामुळे दूध संकलनात मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे. या शिवाय काही महत्त्वाच्या पिशवीबंद दूध कंपन्यांकडूनदेखील दुधाचा पुरवठा शुक्रवारी कमी झाला. परिणामी ४० ते ५० टक्के दूधपुरवठा घटला.
शहरात साधारण दररोज १५ लाख लिटर दुधाचा पुरवठा होतो. नगर, शिरुर, जुन्नर, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि शहर हद्दीलगतच्या गावांमधून संकलित केलेले दूध येथे प्रामुख्याने येते. त्यात जवळपास दहा लाख लिटर दूध पिशवीबंद येते. तर, सुमारे ५ लाख लिटर दुधाचा पुरवठा हा गवळ्यांमार्फत होतो. गवळी या संपात सहभागी नसल्याने काहीसा दूध पुरवठा सुरळीत आहे. पिशवीबंद दुधाचा पुरवठा मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाला आहे.
या बाबत माहिती देताना पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे (कात्रज) व्यवस्थापकीय संचालक डॉ. विवेक क्षीरसागर म्हणाले, कात्रज डेअरीत दररोज २ लाख २५ हजार लिटर दुधाची आवक होते. शुक्रवारी केवळ १ लाख ३५ हजार लिटर दूध आले. डेअरीमध्ये जवळपास २ लाख लिटर दुधाचा साठा असतो.
त्यामुळे शुक्रवारी फारसा
परिणाम जाणवला नाही. शनिवारपासून त्याची तीव्रता वाढेल. त्यामुळे संपकाळात दुधाचे इतर उपपदार्थ न करता केवळ दूध वितरण करण्यात येईल. या शिवाय कात्रज डेअरीतील एक वितरण केंद्र २४ तास सुरु ठेवण्यात येईल.

गणेशपेठ दूध खरेदी-विक्री संघाचे उपाध्यक्ष दामोदर हिंगमिरे म्हणाले, मावळ, मुळशी आणि वेल्हा भागातून दूध आले नाही. शहर हद्दीलगतच्या पंधरा-वीस किलोमीटर हद्दीतील दूध शुक्रवारी आले. त्यामुळे दररोजचे दूध संकलन ८ हजार लिटरवरून ३ हजार लिटरपर्यंत खाली घसरले होते. परिणामी दुधाच्या दरात प्रतिलिटर ६० वरुन ७० रुपयापर्यंत वाढ झाली.


50% दूधपुरवठा घटला

शहरात दररोज १५ लाख लिटर दुधाची आवक होते. त्यातील दहा लाख लिटर दूध विविध कंपन्यांमार्फत वितरित होते. गवळ्यांमार्फत वितरित होणाऱ्या दुधावर फारसा परिणाम झाला नाही.
- विवेक क्षीरसागर,
व्यवस्थापकीय संचालक, कात्रज दूध

सोनाई दूध संघात दूध
संकलन झाले नाही. सोनाई उद्योग समूहाने शेतकऱ्यांच्या मागणीला आज पाठिंबा दिला आहे.
इंदापूरचा येत्या रविवारचा आठवडा बाजार बंद ठेवण्याचे आवाहन शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.

१८ लाख लिटर

सोनाईचे दररोजचे दूध संकलन १८ लाख लिटर आहे. ढोबळमानाने दररोजच्या दूध संकलनामधून सोनाई १५० टन दूध भुकटी व ६० टन बटर बनवते.

Web Title: Vegetable milkkondi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.