नाशिकमध्ये भाजीपाल्याचे दर वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2018 11:53 AM2018-10-13T11:53:17+5:302018-10-13T11:53:17+5:30
भाजीपाला : लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत उन्हाळी कांद्याच्या भावात अचानक ३०० रुपयांनी वाढ होऊन १३९४ रुपये भाव मिळाला.
लाल कांदा न आल्याने शुक्रवारी लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत उन्हाळी कांद्याच्या भावात अचानक ३०० रुपयांनी वाढ होऊन १३९४ रुपये भाव मिळाला.
नाशिकमध्ये पालेभाज्या, फळभाज्यांची आवक घटल्याने भावात सुधारणा झाली. नाशिकला इंदूर येथून वाटाण्याची आवक होते. शुक्रवारी येथे ४० क्विंटल वाटाण्याची आवक होऊन सरासरी १२ हजार रुपये क्ंिवटल भाव मिळाला. शुक्रवारी बाजार समितीत ३३३५ क्ंिवटल टोमॅटोची आवक होऊन सरासरी ७५० रुपये प्रतिक्ंिवटल दर मिळाला.
वांगी, फ्लॉवर, कोबी, ढोबळी मिरची, भोपळा, कारले, दोडका, गिलके या भाज्यांच्या दरातही वाढ झाली. कोथंबिरीची शुक्रवारी ६२,५०० जुड्यांची आवक झाली. सरासरी ४० रुपये जुडी असा दर होता. मेथी, शेपू, कांदापात, या भाज्यांचीही आवक घटल्याने त्यांचे भावही वधारले.