मुंबईतील भाजीपाल्यात स्वस्ताई कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2018 11:51 AM2018-10-09T11:51:06+5:302018-10-09T11:52:21+5:30

फळे,भाजीपाला : मुंबईमधील भाजीपाला व फळ मार्केटमध्ये बाजारभाव घसरू लागले आहेत.

Vegetable prices in Mumbai continue decreases | मुंबईतील भाजीपाल्यात स्वस्ताई कायम

मुंबईतील भाजीपाल्यात स्वस्ताई कायम

Next

मुंबईमधील भाजीपाला व फळ मार्केटमध्ये बाजारभाव घसरू लागले आहेत. एक आठवड्यापासून १३० टन संत्रा व ३०० ते ४०० टन मोसंबीची आवक होऊ लागली आहे. अमरावती, नगर व शिरूर परिसरातून संत्र्यांची आवक होत असून, होलसेल मार्केटमध्ये ६ ते ३६ रुपये किलो दराने विक्री होत आहे.

मोसंबी महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांतून व आंध्र प्रदेशमधून येत असून ६ ते २६ रुपये किलो दराने विकली जात आहे. भाजी मार्केटमध्येही बाजारभाव मोठ्या प्रमाणात घसरले आहेत. कोबी, टोमॅटो,फ्लॉवर व इतर वस्तूंची आवक वाढली आहे. सप्टेंबरच्या तुलनेमध्ये ४० ते ५० टक्के दर कमी झाले आहेत. चवळी शेंग १६ ते २० रुपयांवरून ८ ते १२ रुपये, फ्लॉवर २० ते २२ वरून ८ ते १२ रुपये किलो दराने विकली जात आहे. भाजी व फळ मार्केटमधील दर आटोक्यात असल्यामुळे हीच स्वस्ताई दसरा व दिवाळी संपेपर्यंत कायम राहावी, अशी अपेक्षा आहे.

Web Title: Vegetable prices in Mumbai continue decreases

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.