मुंबईत भाजीपाल्यांचे दर कडाडले

By admin | Published: June 2, 2017 12:28 PM2017-06-02T12:28:30+5:302017-06-02T12:28:30+5:30

राज्यभरातील विविध कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये शेतक-यांनी शेतीमालच पाठवला नसल्याने फळभाज्यांचे दर कडाडले आहेत.

Vegetable prices in Mumbai slumped | मुंबईत भाजीपाल्यांचे दर कडाडले

मुंबईत भाजीपाल्यांचे दर कडाडले

Next

 ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. 2 - राज्यभरातील विविध कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये शेतक-यांनी शेतीमालच पाठवला नसल्याने फळभाज्यांचे दर कडाडले आहेत. मुंबईत दादर, भायखळा बाजारपेठा ओस पडल्या असून, रोज जिथे गजबजाट असायचा तिथे शुकशुकाट आहे. मुंबईत पालेभाज्या आणि फळभाज्यांचे दर ५० टक्क्यांपासून ३०० टक्क्यांपर्यंत वाढले आहेत.
 
आवक घटल्यामुळे कालचाच माल विक्रेत्यांनी आज दुप्पट किंमतीने विकला. रोजच्या ग्राहकांना दरवाढीचा चटका लागला नसला, तरी नव्या ग्राहकांकडून चांगला नफा कमावल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.  हिंसक आंदोलनामुळे शेतकरी माल पाठवण्यास तयार नसल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
 
दरम्यान दुपारी १ वाजेपर्यंत गजबजाट असणाऱ्या भायखळा मार्केटमध्ये आज ११.30 वाजताच शुकशुकाट दिसत आहे. सर्व माल संपल्यामुळे लवकर बाजार आटपल्याचेही मार्केटचे अध्यक्ष किरण झोडगे यांनी सांगितले.दादरमध्ये रोज 200 गाडया भरून भाजीपाला येतो पण आज फक्त 50 ते 60 गाडयांमधून भाजीपाला आला. 
 

Web Title: Vegetable prices in Mumbai slumped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.