आवक वाढूनही भाज्या महागच!

By admin | Published: June 7, 2017 05:57 AM2017-06-07T05:57:46+5:302017-06-07T05:57:46+5:30

शेतकरी संपामुळे बंद असलेल्या राज्यातील बहुतांश बाजार समित्यांचे व्यवहार आता पूर्ववत झाले

Vegetables are expensive due to the increase in arrivals | आवक वाढूनही भाज्या महागच!

आवक वाढूनही भाज्या महागच!

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : शेतकरी संपामुळे बंद असलेल्या राज्यातील बहुतांश बाजार समित्यांचे व्यवहार आता पूर्ववत झाले असून मुंबई बाजार समितीत मंगळवारी १३६१ ट्रक भाजीपाला, फळे व इतर शेतीमालाची आवक झाली. मात्र, तरीही महानगरात भाजीटंचाई कायम असल्याने हा भाजीपाला जातो कुठे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
बाजारातील आवक आणि जावक पूर्ववत झाली असताना येणारी फळं आणि भाजीपाला जातो कुठे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. शेतीमालाच्या हमीभावासाठी शेतकरी संपावर गेलेले असताना व्यापारी मात्र चढ्या भावाने भाज्या व फळांची विक्री करत असल्याचे दिसून येते. व्यापारी, पंचतारांकित हॉटेल्स आणि काही खासगी संस्थांनी शीतगृहांमध्ये भाजी व फळांची साठवणूक वाढवल्याने मुंबईत टंचाई निर्माण झाल्याचे किरकोळ विक्रेत्यांचे म्हणणे आहे. पोलीस बंदोबस्तात पश्चिम महाराष्ट्र व गुजरातहून दुधाचे टँकर्स
मुंबईत येत असताना दुधाची टंचाई कायम आहे.
संपाच्या सहाव्या दिवशी शेतकऱ्यांनी आंदोलन अधिक आक्रमक करत सरकारी कार्यालयांना टाळे ठोकले. त्यामुळे काही ठिकाणी तणाव निर्माण झाला होता. दूध संकलन पूर्ववत सुरू झाले असले तरी भाज्यांचे दर गगनला भिडले आहेत. सोमवारचा बंद यशस्वी झाल्यानंतर मंगळवारी शेतकऱ्यांनी शासकीय कार्यालयांकडे मोर्चा वळवला. अनेक ठिकाणी कार्यालयांना प्रतीकात्मक स्वरूपात टाळे ठोकले. कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, सोलापूर, नाशिक आणि मराठवाड्यात संपाची तीव्रता कायम आहे. विदर्भात सर्व व्यवहार पूर्ववत झाले असून खान्देशातून आज मोठ्या प्रमाणात भाजीपाला मुंबईत आला. संपामुळे दूध-भाज्यांची आवक ठप्प होऊ नये म्हणून सातारा जिल्हा पोलिसांनी पुणे-बंगलोर महामार्गावर ४00 पोलीस तैनात केले आहेत.
सोमवारपासून दूधपुरवठा सुरळीत झाला असून, भाजीपाल्याची आवकही वाढली आहे. मुंबई बाजार समितीत मंगळवारी १३६१ ट्रक भाजीपाला आला असल्याची माहिती मुख्य प्रशासक सतीश सोनी यांनी दिली.
>मुंबई बाजार
समितीतील आवक
प्रकारएकूण ट्रक
फळे३९१
भाजीपाला४४२
कांदा९१
बटाटा५६
लसूण१२
मसाले११८
धान्य२५१
एकूण १३६१

Web Title: Vegetables are expensive due to the increase in arrivals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.