वातावरणात होत असलेल्या बदलामुळे भाजीपाला कडाडला; वाटाणा, फ्लाॅवर आले तेजीत, भोपळ्याचे दरही झाले दुप्पट

By ऑनलाइन लोकमत | Published: February 29, 2024 09:55 AM2024-02-29T09:55:42+5:302024-02-29T09:55:54+5:30

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी ६७७ वाहनांमधून  ३ हजार टन भाजीपाल्याची आवक झाली आहे.

Vegetables become costly due to climate change; Pea, flower and ginger prices are booming, pumpkin prices have also doubled | वातावरणात होत असलेल्या बदलामुळे भाजीपाला कडाडला; वाटाणा, फ्लाॅवर आले तेजीत, भोपळ्याचे दरही झाले दुप्पट

वातावरणात होत असलेल्या बदलामुळे भाजीपाला कडाडला; वाटाणा, फ्लाॅवर आले तेजीत, भोपळ्याचे दरही झाले दुप्पट

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : वातावरणातील बदलामुळे भाजीपाल्याच्या उत्पादनावर परिणाम होऊ लागला आहे. आवकमध्ये चढ-उतार होत असल्यामुळे बाजारभाव वाढू लागले आहेत. मुंबई बाजार समितीमध्ये फ्लॉवर, वाटाणा, दुधी भोपळ्याच्या दरामध्ये वाढ झाली आहे. 

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी ६७७ वाहनांमधून  ३ हजार टन भाजीपाल्याची आवक झाली आहे. यामध्ये ४ लाख ७२ हजार जुडी पालेभाज्यांचा समावेश आहे. मागील काही दिवसांमध्ये आवकमध्ये चढ-उतार होत आहे. राज्यात दिवसा प्रचंड ऊन व रात्री थंडी असे वातावरण आहे. उन्हामुळे भाजीपाला पिकावर परिणाम होत आहे. अनेक ठिकाणी पुरेसे पाणी उपलब्ध होत नसल्यामुळेही उत्पादन कमी होत आहे. या सर्वांचा मुंबईतील आवकवर परिणाम होत असून, बाजारभाव वाढू लागले आहेत. 

भाजीपाला हाेताेय खराब
किरकोळ मार्केटमध्येही भाजीपाला खराब होण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे बाजारभावही वाढत आहे. किरकोळ मंडईत दुधी ६० रुपये किलो, फरसबी ७० ते ८०, फ्लॉवर ६० ते ८०, गाजर ४० ते ६०,  कारली ५० ते ६०, ढोबळी मिर्ची ८० ते १००, शेवगा शेंग ८० ते १००, वाटाणा ६० ते ८० रुपये किलो दराने विकला जात आहे.

घेवडा, कैरीचे दर नियंत्रणात
बहुतांश भाज्यांचे दर वाढलेले असताना घेवड्याचे दर या आठवड्यात कमी झाले आहेत. दर प्रतिकिलो ३० ते ४० रुपयांवरून २६ ते ३२ रुपये झाले आहेत. कैरी ८० ते ९० रुपयांवरून ६० ते ७० रुपये किलोवर आली आहे.

कारले झाले ४० रुपये किलो
एक आठवड्यात दुधी भोपळ्याचे दर दुप्पट वाढले आहेत. दर प्रतिकिलो १२ ते १६ वरून २४ ते ३० रुपयांवर गेले आहेत. फ्लॉवर १० ते १५ वरून १४ ते १८ झाले आहेत. गवार ४० ते ५० वरून ५० ते ७०, कारली २० ते ३० वरून ३० ते ४०, वाटाणा ३० ते ४० वरून ४६ ते ५६ रुपये किलो दराने विकला जात आहे. 

एक आठवड्यातील भाजीपाल्याच्या दरातील फरक 
    वस्तू    २१ फेब्रुवारी    २८ फेब्रुवारी 
    दुधी भोपळा    १२ ते १६    २४ ते ३०
    फरसबी    २४ ते ३०    २६ ते ३०
    फ्लॉवर    १० ते १५    १४ ते १८
    गाजर    १० ते १५    १२ ते १६
    गवार    ४० ते ५०    ५० ते ७०
    काकडी    १० ते १८    १२ ते २०
    कारली    २० ते ३०    ३० ते ४०
    ढोबळी मिर्ची    ३५ ते ४५    ४० ते ५०
    शेवगा शेंग    ४० ते ५५    ४० ते ६०
    दोडका    २६ ते ३६    ३० ते ४०
    वाटाणा    ३० ते ४०    ४६ ते ५६

Web Title: Vegetables become costly due to climate change; Pea, flower and ginger prices are booming, pumpkin prices have also doubled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.