पुण्यात पुन्हा वाहनांची जाळपोळ, 27 वाहने खाक

By Admin | Published: July 9, 2017 08:06 AM2017-07-09T08:06:21+5:302017-07-09T08:08:32+5:30

पुण्यातील वाहनांच्या जाळपोळीची मालिका सुरूच आहे. काल रात्री पुण्यातील पर्वती परिसरात 26 दुचाकी आणि एक चारचाकी वाहन आग

Vehicles fire again in Pune, 27 vehicles | पुण्यात पुन्हा वाहनांची जाळपोळ, 27 वाहने खाक

पुण्यात पुन्हा वाहनांची जाळपोळ, 27 वाहने खाक

googlenewsNext
>ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 9 - पुण्यातील वाहनांच्या जाळपोळीची मालिका सुरूच आहे. काल रात्री पुण्यातील पर्वती परिसरात 26 दुचाकी आणि एक चारचाकी वाहन आग लावून जाळण्यात आल्याचे उघडकीस आले आहे.  मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला.
पर्वती परिसरातील वस्त्यांमध्ये अरुंद वाट असल्याने तेथील रहिवाशांकडून आपली वाहने मैदानात  पार्क करून ठेवण्यात येत असतात. दरम्यान, मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास येथे पार्क केलेल्या वाहनांना आग लागली. या आगीत 26 दुचाकी आणि एक चार चाकी वाहन जळून खाक झाले. आगीचे वृत्त समजताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत. आग विझवलवी. मात्र तोपर्यंत ही वाहने जळून गेली होती. दरम्यान, अज्ञाताने ही आग लावल्याच्या संशय व्यक्त करण्यात येत आहे.  पुण्यामध्ये सातत्याने वाहनांच्या जाळपोळीचे प्रकार घडत असल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.   

Web Title: Vehicles fire again in Pune, 27 vehicles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.