वेंगसरकर अकादमीचा इंग्लंड दौरा यशस्वी

By admin | Published: July 22, 2016 01:35 AM2016-07-22T01:35:12+5:302016-07-22T01:35:12+5:30

यॉर्कशायरच्या सहकार्याने आॅस्ट्रेलिया आणि इंग्लंड संघाबरोबर आयोजित क्रिकेट स्पर्धेत पी़सी़एम़सी.ज व्हेरॉक वेंगसकर संघाने ९ पैकी ५ सामन्यांत बाजी मारली

Vengsarkar Academy's successful England tour in England | वेंगसरकर अकादमीचा इंग्लंड दौरा यशस्वी

वेंगसरकर अकादमीचा इंग्लंड दौरा यशस्वी

Next


पिंपरी : यॉर्कशायरच्या सहकार्याने आॅस्ट्रेलिया आणि इंग्लंड संघाबरोबर आयोजित क्रिकेट स्पर्धेत पी़सी़एम़सी.ज व्हेरॉक वेंगसकर संघाने ९ पैकी ५ सामन्यांत बाजी मारली आहे़ २४ जून ते १० जुलै रोजी इंग्लंड येथे सराव सामने खेळण्यासाठी गेलेल्या पी़सी़एम़सी.ज व्हेरॉक वेंगसरकरचा यशस्वी दौरा नुकताच पूर्ण झाला आहे़
या दौऱ्यामध्ये एकूण नऊ सामने आयोजित करण्यात आले होते़ पैकी पाच सामन्यात विजय, एका सामन्यात पराभव आणि ३ सामने पावसामुळे रद्द करण्यात आले
आॅस्ट्रेलिया आणि इंग्लंड संघाबरोबर क्रिकेट सामने खेळण्यासाठी नेहमीच खडतर आव्हान असते़ हे आव्हान आणि वातावरण जुळवून घेताना खेळाडूंना खूप कष्ट करावे लागले़ असे संघ व्यवस्थापकाने सांगितले़
लॅकेशायर लीग संघाविरुद्ध पहिल्याच सामन्यात पी़सी़एम़सीज् व्हेरॉक वेंगसकर संघाला पराभव पत्कारावा लागला़ नंतरच्या क्लब सिलेक्ट इलेव्हन विरूद्ध सामन्यात पाच गडी आणि १४ षटके राखत पी़सी़एम़सीज व्हेरॉक वेंगसरकर संघाने विजय मिळवला़
इंग्लंड दौऱ्यात पी़सी़एम़सीज् व्हेरॉक वेंगसरकर संघाकडून अष्टपैलू कामगिरी करत ओमकार जाधव याने सर्वाधिक २९३ धावा करत सहा गडी बाद केले, तर अग्नि चोप्रा याने १४४ धावा काढल्या़ धृमिल मटकर याने १०८ धावा काढत नऊ गडी बाद केले़
इंग्लंड येथे सामने खेळल्यामुळे खेळाडूंना चांगला फायदा होईल, तसेच आपल्या खेळाडूंनी चांगली कामगिरी केली, असे मत राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे संचालक दिलीप वेंगसरकर यांनी व्यक्त केले़
(प्रतिनिधी)

Web Title: Vengsarkar Academy's successful England tour in England

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.