वेंगुर्लेत काँग्रेस-सेनेला ‘थोडी खुशी थोडा गम’
By admin | Published: February 26, 2017 12:16 AM2017-02-26T00:16:53+5:302017-02-26T00:16:53+5:30
‘राष्ट्रवादी’चा बुरूज ढासळलाच : ‘भाजप’ने पंचायत समितीत खाते उघडले; आव्हान मात्र फोल ठरले
यवतमाळ : खात्यांतर्गत फौजदारपदावर पात्र उमेदवारांना सेवाज्येष्ठतेनुसार नियुक्ती द्यावी, या मुुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणारी पोलिसांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी फेटाळून लावली.
महाराष्ट्र पोलीस दलात फौजदारांच्या १ हजार ९०७ जागांवरील नियुक्त्या गुणवत्तेनुसार की सेवाज्येष्ठतेनुसार याचा वाद गेली तीन वर्षे मुंबई उच्च न्यायालयात सुरू होता. त्यावर २१ डिसेंबर २०१६ रोजी मुंबई उच्च न्यायालयाने निर्णय देताना परीक्षा उत्तीर्ण होऊन पात्र ठरलेल्या उमेदवारांना सेवाज्येष्ठतेनुसार नियुक्त्या देण्याचे आदेश जारी केले होते. या निर्णयाला जमादार अशोक लक्ष्मण सावंत व अन्य पोलीस कर्मचाऱ्यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. अभ्यास करून परीक्षा दिल्याने गुणवत्ताच योग्य ठरावी, सर्वाधिक गुण मिळवूनही ज्येष्ठतेच्या आधारावर नियुक्ती नाकारली जात असेल तर परीक्षेला अर्थ काय? आदी मुद्दे उपस्थित करण्यात आले होते. परंतु न्या. आदर्शकुमार गोयल व न्या. उदय उमेश ललित यांच्या खंडपीठाने गुरुवारी ही याचिका फेटाळून लावताना मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय योग्य ठरविला. त्यामुळे महाराष्ट्र पोलीस दलातील सेवाज्येष्ठ पोलीस कर्मचाऱ्यांच्या फौजदारपदावरील स्थायी नियुक्तीचा मार्ग सुकर झाला आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालानंतर संभाव्य अपीलाची चिन्हे पाहून महासंचालक कार्यालयाने आधीच सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल करून ठेवला होता, हे विशेष. खात्यांतर्गत फौजदारांच्या रिक्त असलेल्या सुमारे ४०० ते ५०० जागा लवकरच नव्याने परीक्षा घेऊन भरल्या जाणार असल्याचे विशेष पोलीस महानिरीक्षक (आस्थापना) राजकुमार व्हटकर यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे.