नगरमध्ये प्रेमीयुगलाकडून विष प्राशन
By admin | Published: February 29, 2016 04:22 AM2016-02-29T04:22:52+5:302016-02-29T04:22:52+5:30
पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वरजवळील खडकवाडी शिवारात विवाहित प्रेमीयुगलाने विष घेतल्याची घटना रविवारी दुपारी घडली़ यात तरुणाचा मृत्यू झाला असून
अहमदनगर : पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वरजवळील खडकवाडी शिवारात विवाहित प्रेमीयुगलाने विष घेतल्याची घटना रविवारी दुपारी घडली़ यात तरुणाचा मृत्यू झाला असून, महिला अत्यवस्थ आहे़ उत्तम चिंतामण मिंढे (३५) असे यातील मृताचे नाव आहे.
टाकळी ढोकेश्वर- साकूर रस्त्यावर खडकवाडी शिवारात वनविभागाच्या हद्दीत एक महिला व एक पुरुष अत्यवस्थ अवस्थेत असल्याचे ग्रामस्थांनी पाहिले़ पोलिसांनी दोघांनाही प्रथम ग्रामीण रुग्णालयात दाखल केले़ तेथे मिंढे मृत झाल्याचे निष्पन्न झाले़ तर महिला अत्यवस्थ असल्याने तिला नगर येथे उपचारासाठी पाठविण्यात आले़
त्यांच्याकडील कागदपत्रांवरून पोलिसांनी तपास केला असता दोघेही वाघोली (जि.पुणे) येथे राहात होते. उत्तम मिंढे हा वाहन चालक होता़ पत्नी सोडून गेल्यापासून तो या महिलेसोबत राहात होते़
२४ फेबु्रवारीला दोघेही घरातून बाहेर पडले होते़ त्यानंतर रविवारी दोघेही विष घेतलेल्या अवस्थेत खडकवाडी परिसरात आढळून आले़ (वार्ताहर)