सहा वर्षांत नियुक्त झालेल्या शिक्षकांच्या टीईटी प्रमाणपत्रांची होणार पडताळणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2019 05:42 AM2019-01-17T05:42:34+5:302019-01-17T05:42:55+5:30
- दीपक जाधव पुणे : राज्यातील सर्व शाळांमध्ये फेब्रुवारी २०१३ पासून भरती झालेल्या शिक्षकांच्या शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण झालेल्या ...
- दीपक जाधव
पुणे : राज्यातील सर्व शाळांमध्ये फेब्रुवारी २०१३ पासून भरती झालेल्या शिक्षकांच्याशिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण झालेल्या प्रमाणपत्रांची पडताळणी करण्यात येणार आहे. अनेक शिक्षकांनी टीईटी परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे बनावट प्रमाणपत्र सादर करून नोकऱ्या मिळविल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. असे बनावट प्रमाणपत्र तयार करून देणारे मोठे रॅकेट कार्यरत असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
शिक्षण हक्क कायद्यातील तरतुदीनुसार इयत्ता १ ली ते ८ वी पर्यंतच्या वर्गांना शिकविणाºया शिक्षकांनी शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे. राज्य शासनाने १२ फेब्रुवारी २०१३ रोजी या शिक्षकांनी टीईटी उत्तीर्ण असणे बंधनकारक असल्याचे परिपत्रक काढले. परिषदेच्या प्रमाणपत्रांशी तंतोतंत जुळणारी बनावट प्रमाणपत्रे काही जणांनी सादर केल्याने ही पडताळणी होणार आहे.
शिक्षण संचालकांना पत्र
१३ फेब्रुवारी २०१३ नंतर राज्यातील जिल्हा परिषद, महापालिका व खासगी शाळांमध्ये नियुक्त झालेल्या सर्व शिक्षकांच्या टीईटी प्रमाणपत्रांची पडताळणी करून घ्यावी, असे पत्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांनी प्राथमिक व माध्यमिकचे शिक्षण संचालक यांना पाठविले आहे.
त्यानुसार शिक्षण संचालकांनी या टीईटी प्रमाणपत्रांची पडताळणी करून घेण्याबाबतची कार्यवाही सुरू केलेली आहे. या पडताळणीतून अनेक बनावट प्रमाणपत्रे उजेडात येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.