वर्सोवा-वांद्रे सागरी सेतूला मंजुरी
By admin | Published: June 14, 2017 01:02 AM2017-06-14T01:02:59+5:302017-06-14T01:02:59+5:30
वर्सोवा ते वांद्रे असा सागरी सेतू उभारण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून त्यासाठी ७ हजार ५०२ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
- विशेष प्रतिनिधी । लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : वर्सोवा ते वांद्रे असा सागरी सेतू उभारण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून त्यासाठी ७ हजार ५०२ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात झालेल्या पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत त्यास मंजुरी देण्यात आली.
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेची क्षमता वाढविणे, वांद्रे-वरळी सागरी सेतूच्या पूर्ण केलेल्या कामाच्या खचार्पोटी ३२८ कोटींचा अतिरिक्त निधी देणे, ठाण्यात नव्याने बांधावयाच्या ७७५ कोटींच्या क्रिक ब्रिजला मंजूरी देणे, ठाणे-घोडबंदर रस्ता सहा पदरी करण्यासाठी ६६७ कोटी रुपयांच्या प्रस्तावाला मंजूरी देणे, भिवंडी-कल्याण शिळफाटा रस्ता सहा पदरी करण्यासाठी ३८९ कोटी रुपयांच्या प्रस्तावास मंजूरी देणे आणि बारामती एकात्मिक रस्ते विकास योजनेच्या कामाचा झालेला खर्च रस्ते विकास महामंडळास देण्यास मंजूरी दिली.