वर्सोवा बीच स्वच्छतेसाठी प्लास्टिक उत्पादक संघटनेची साथ

By admin | Published: April 16, 2017 09:05 PM2017-04-16T21:05:28+5:302017-04-16T21:05:44+5:30

मुंबईतील समुद्रकिना-यांची दयनीय अवस्था झाली असून, किना-यांवर जमा होणा-या कचरा आणि प्लास्टिकमुळे मुंबईतील समुद्रकिनारे हे जणू कचराकुंड्या झाल्या

Versova Beach Clean-up Plastics Association | वर्सोवा बीच स्वच्छतेसाठी प्लास्टिक उत्पादक संघटनेची साथ

वर्सोवा बीच स्वच्छतेसाठी प्लास्टिक उत्पादक संघटनेची साथ

Next

मनोहर कुंभेजकर/ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 16 - मुंबईतील समुद्रकिना-यांची दयनीय अवस्था झाली असून, किना-यांवर जमा होणा-या कचरा आणि प्लास्टिकमुळे मुंबईतील समुद्रकिनारे हे जणू कचराकुंड्या झाल्या आहेत. त्यामुळे मासेमारीवर देखील परिणाम झाला असून कोळी बांधवांच्या जाळ्यात माश्यांच्या ऐवजी प्लास्टिक आणि कचरा सापडत असल्याचे चित्र आहे. मात्र लोकसहभागातून हे चित्र बदलले जात असल्याचे वर्सोवा बीचने जगाला दाखवून दिले.
देशाला अभिमान वाटावा आणि युनायटेड नेशनच्या पर्यावरण प्रमुखांनी गौरवलेल्या वर्सोवा रेसिडेंट व्हॉलेंटर्स(व्हीआरव्ही)च्या वर्सोवा बीच क्लिनिंग मोहिमेला जून 2015 पेशाने वकील असलेल्या अफरोज शहा यांनी सुरुवात केली. जागतिक पातळीवर या मोहिमेची दखल घेण्यात आली आहे, अशी माहिती वेसावे येथील एमबीएचा विद्यार्थी मोहित रामले यांनी दिली, आज या स्वच्छता मोहिमेचा 80 वा सप्ताह होता. गेली 79 आठवडे दर शनिवारी आणि रविवारी ही मोहीम येथे सुरू आहे. या मोहिमेचे शिल्पकार अफरोज शहा आणि त्यांचे 200 कार्यकर्ते मुंबई महापालिकेच्या सहकार्याने वर्सोवा बीच स्वच्छता मोहीम यशस्वीपणे राबवत आहेत. वेसावे कोळीवाड्यातील कोळी बांधवांचे या मोहिमेला उत्स्फूर्त सहकार्य मिळाले आहे. आतापर्यंत येथील बीचवरून ५० लाख किलो कचरा काढण्याचा विक्रम केल्याची माहिती या मोहिमेत सहभागी असलेले वेसाव्याचे राजहंस टपके आणि प्रवीण भावे यांनी दिली.

वर्सोवा बीच स्वच्छता मोहिमेला आता ऑल इंडिया प्लास्टिक मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (एआयपीएमए)या संघटनेची साथ मिळाली आहे. गेल्या रविवारपासून या संस्थेने सामाजिक बांधिलकी म्हणून खास बीचवरील कचरा काढण्यासाठी ट्रॅक्टर आणि 9 कामगार उपलब्ध करून दिले आहे. तर सुरुवातीपासूनच या मोहिमेला पालिका आयुक्त अजोय मेहता आणि पालिकेच्या के पश्चिम विभागाने मोलाचे सहकार्य केले असून, यांनी पालिकेकडून 1 ट्रॅक्टर, 2 जेसीबी आणि 18 कामगार उपलब्ध करून दिली असल्याची दिली.

आज सकाळी या ट्रॅक्टरचे उद्घाटन

आज सकाळी अखिल भारतीय प्लास्टिक मॅन्युफॅक्चररच्या ट्रॅक्टरचा शुभारंभ मच्छलीमार येथे वर्सोव्याच्या भाजपा आमदार डॉ.भारती लव्हेकर, के पश्चिम प्रभाग समिती अध्यक्ष योगीराज दाभाडकर, वर्सोवा प्रभाग क्रमांक 59च्या शिवसेना नगरसेविका प्रतिमा खोपडे, वर्सोवा रेसिडेंट व्हॉलेंटर्स(व्हीआरव्ही)चे अफरोज शहा, पालिकेच्या के पश्चिम विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रशांत गायकवाड, हिरेन संघवी, अभिनेत्या पूजा बेदी, निर्माते सुभाष घई इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी समुद्रकिनारी ३० नारळाची मोठी झाडे लावण्यात आली. या मान्यवरांसह व्हीआरव्ही चे कार्यकर्ते, के पश्चिम विभागाचे कर्मचारी आणि एआयएमएचे ८ कर्मचारी आणि पदाधिकारी यांनी या बीच स्वच्छता मोहिमेत सहभागी होऊन सुमारे १०००० किलो कचरा काढला, अशी माहिती अफरोज शहा यांनी दिली. तर येथील 2.8 किमी बीचवर जमा होणारे प्लास्टिकचे आणि इतर कचराजन्य पदार्थांचे रिसायकलिंग करण्याचा आमचा मनोदय असल्याचे एआयपीएमएचे या संघटनेचे हरेन संघवी आणि पर्यावरण विभागाचे अध्यक्ष अखिलेश भार्गव यांनी सांगितले.

Web Title: Versova Beach Clean-up Plastics Association

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.