ज्येष्ठ अभिनेत्री रिमा लागू काळाच्या पडद्याआड

By admin | Published: May 18, 2017 07:48 AM2017-05-18T07:48:24+5:302017-05-18T10:55:14+5:30

प्रसिद्ध अभिनेत्री रिमा लागू यांचे गुरुवारी पहाटे आकस्मिक निधन झाले. त्या 59 वर्षांच्या होत्या.

Veteran actress Rima is behind the scenes of the era | ज्येष्ठ अभिनेत्री रिमा लागू काळाच्या पडद्याआड

ज्येष्ठ अभिनेत्री रिमा लागू काळाच्या पडद्याआड

Next

 ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. 18 - प्रसिद्ध अभिनेत्री रिमा लागू यांचे गुरुवारी पहाटे ह्दयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्या 59 वर्षांच्या होत्या. अंधेरीच्या कोकिलाबेन रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गुरुवारी रात्री अचानक त्यांच्या छातीत दुखायला लागल्याने कुटुंबिय त्यांना जवळच्या कोकिलाबेन रुग्णालयात घेऊन गेले. 
 
तिथे उपचार सुरु असताना त्यांची प्राणज्योत मालवली.ओशिवरा येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर दुपारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.  शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मराठी रंगभूमीपासून सुरुवात करणा-या रिमा लागू यांनी अनेक मराठी, हिंदी चित्रपट, मालिका आणि नाटकांमध्ये काम केले होते. त्यांच्या आकस्मिक निधनाचे वृत्त चित्रपटसृष्टीसह सर्वांसाठीच एक धक्का आहे. 
 
मेने प्यार किया, आशिकी, साजन, हम आपेक हैं कोन, वास्तव, कुछ कुछ होता हैं आणि हम साथ साथ हैं या गाजलेल्या हिंदी चित्रपटातील त्यांची आईची व्यक्तीरेखा आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. त्यांनी 50 पेक्षा जास्त सिनेमांमध्ये काम केले आहे. रिमा लागू यांना त्यांच्या आईकडून अभिनयाचा वारसा मिळाला. पुणे येथील हुजूरपागा या शाळेत शिकत असताना त्यांच्या अभिनय क्षमतेने लक्ष वेधून घेतले.  शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांचा अभिनेत्री म्हणून प्रवास सुरु झाला. मराठी रंगभूमीपासून त्यांनी अभिनयाला सुरुवात केली. 
 
70-80 च्या दशकात रिमा लागू यांनी हिंदी आणि मराठी चित्रपटात काम सुरु केले. विवेक लागू यांच्याबरोबर त्यांचे लग्न झाले पण काही वर्षच त्यांचा संसार टिकला. त्यानंतर दोघेही विभक्त झाले. त्यांची मुलगी मुण्मयी ही सुद्धा अभिनेत्री आणि दिग्दर्शिका आहे. 
कलयुग हा रिमा लागू यांचा पहिला हिंदी सिनेमा. हिंदी चित्रपटात रिमा लागू यांनी प्रामुख्याने सहाय्यक अभिनेत्रीच्या आणि आईच्या भूमिका केल्या. पण त्यांचे हे सर्व रोल्स चांगलेच गाजले. करीयरच्या सुरुवातीला त्यांनी आक्रोश सिनेमात डान्सरची भूमिका केली होती. सुप्रिया पिळगावकर बरोबरची तूतू-मेंमें, श्रीमान-श्रीमती या त्यांच्या हिंदी मालिका प्रचंड गाजल्या. 

माझा आधार हरपला - आशा वेलणकर
दरम्यान, रिमा लागू यांची सख्खी मोठी बहीण आशा वेलणकर या डोंबिवली येथे वास्तव्यास आहेत. रिमा ताई आशा यांच्या 70 व्या वाढदिवसानिमित्त 26 एप्रिल रोजी डोंबिवली येथे आल्या होत्या. त्यानंतरही दोघींमध्ये अगदी रोज फोनवर बोलणं व्हायचे, कालही नेहमीप्रमाणे बोलणे झाले होते. फोनवर बोलताना रिमा यांनी तब्येतीबाबत कोणतीही तक्रार केली नाही. हे सर्व अचानक कसे झालं, याचा मला धक्का बसला आहे. माझा मोठा आधार हरपला आहे, अशी भावनिक प्रतिक्रिया आशा वेलणकर यांनी ""लोकमत""सोबत बोलताना दिली आहे. 
  
रिमा लागू यांची गाजलेली नाटक 
पुरुष बुलंद
चल आटप लवकर
सविता दामोदर परांजपे
विठो रखुमाय
घर तिघांचं हवं
झाले मोकळे आकाश
तो एक क्षण 
 
""मैंने प्यार किया"", ""साजन"", ""हम साथ साथ हैं"", ""जुडवा"" आणि ""पत्थर के फूल"" या सिनेमात त्यांनी सलमान खानच्या आईची भूमिका केली. 
 
1990 साली मैंने प्यार किया, 1991 साली आशिकी, 1995 साली हम आपके हैं कौन आणि 2000 साली वास्तव या सिनेमांसाठी त्यांना चारवेळा फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. 
 
रिमा लागू यांच्या मालिका 
खांदान, श्रीमान-श्रीमती, तूतू-मेंमें, दो और दो पाच, धडकन, कडवी खट्टी मिठ्ठी, दो हंसो का जोडा, तुझ माझ जमेना, नामकरण. 
 

Web Title: Veteran actress Rima is behind the scenes of the era

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.