ज्येष्ठ शिल्पकार बी आर खेडकर यांचे निधन

By admin | Published: August 13, 2016 02:46 PM2016-08-13T14:46:35+5:302016-08-13T14:46:49+5:30

के. आसिफ यांच्या ‘मुघल-ए-आझम’ चित्रपटासाठी कलादिग्दर्शनामध्ये योगदान देणारे ज्येष्ठ शिल्पकार बी.आर.खेडकर यांचे निधन झाले.

Veteran architect B.R. Khedkar passed away | ज्येष्ठ शिल्पकार बी आर खेडकर यांचे निधन

ज्येष्ठ शिल्पकार बी आर खेडकर यांचे निधन

Next
>ऑनलाइन लोकमत
पुणे, दि.१३ -  नऊ फूट उंचीच्या पुतळ्यापासून ते साडेअठरा फूट उंचीचा अशी छत्रपती शिवाजीमहाराजांची शिल्पे घडविणारे, के. आसिफ यांच्या ‘मुघल-ए-आझम’ चित्रपटासाठी कलादिग्दर्शनामध्ये योगदान देणारे ज्येष्ठ शिल्पकार बी.आर.खेडकर यांचे दीर्घ आजारपणाने दि. १३ आॅगस्ट रोजी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी निधन झाले. ते ९० वर्षांचे होते. त्यांच्यामागे ९ मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. 
 
बी.आर.खेडकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे ३५ हून अधिक अश्वारुढ पुतळयांसह सुमारे ३५० पुतळे घडवले. कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, यशवंतराव चव्हाण, महात्मा ज्योतिबा फुले आदि महान व्यक्तींची शिल्पे त्यांनी घडवली. पुण्यातील गणेशोत्सव आणि खेडकर यांचे अतूट नाते होते. त्यांनी पाच दशकांहून अधिक काळ पुण्यात गणेशसेवा केली

Web Title: Veteran architect B.R. Khedkar passed away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.