ज्येष्ठ पत्रकार गोविंद तळवलकर यांचं अमेरिकेत निधन
By Admin | Published: March 22, 2017 07:41 AM2017-03-22T07:41:17+5:302017-03-22T12:21:41+5:30
ज्येष्ठ पत्रकार आणि प्रसिद्ध स्तंभलेखक गोविंद तळवलकर यांचे बुधवारी अमेरिकेत निधन झाले.
ऑनलाइन लोकमत
वॉशिंग्टन, दि. 22 - ज्येष्ठ पत्रकार आणि प्रसिद्ध स्तंभलेखक गोविंद तळवलकर यांचे बुधवारी अमेरिकेत निधन झाले. अनेक वर्षांपासून ते अमेरिकेत वास्तव्यास होते. मराठीसह इंग्रजी भाषेतील स्तंभलेख आणि अग्रलेखांसाठी गोविंद तळवलकर यांचे नाव प्रसिद्ध होते.
गोविंद तळवलकरांनी 1947 साली बी.ए. झाल्यानंतर शंकरराव देव यांच्या नवभारतमध्ये काम करण्यास सुरुवात केली. पुढे 1950 ते 1962 अशी बारा वर्षे ते लोकसत्तामध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत होते. 1962-67 च्या दरम्यान त्यांना 'महाराष्ट्र टाइम्स'मध्ये काम करण्याची संधी मिळाली. 1968 मध्ये महाराष्ट्र टाइम्सच्या संपादकपदाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली आणि पुढे 1996 पर्यंत म्हणजे तब्बल 27 वर्षे ते 'महाराष्ट्र टाइम्स'चे संपादक होते.
टाइम्स ऑफ इंडिया, इलस्ट्रेटेड वीकली ऑफ इंडिया, द हिंदू, द डेक्कन हेरॉल्ड, रॅडिकल ह्युमनिस्ट, फ्रंटलाइन अशा इंग्रजी वृत्तपत्रांतून आणि साप्ताहिकांतूनही तळवलकरांनी लेखन केले. गोविंद तळवळकरांच्या लेखनाच्या प्रभावाने किमान दोन पिढ्यांचे बौद्धिक पोषण झाले. आपल्या लेखनातून तळवलकरांनी वेळोवेळी महात्मा गांधीवर होणार्या टीकांना मुद्देसूद उत्तरे दिली.
प्रकाशित साहित्य
अग्निकांड :- "युद्धाच्या छायेत" ह्या स्तंभलेखनाचा पुस्तकरूपी संग्रह
अफगाणिस्तान
अभिजात (१९९०)
अक्षय (१९९५)
इराक दहन :- सद्दाम हुसेन यांच्या पाडावाच्या निमित्ताने आंतरराष्ट्रीय दहशतवादाच्या विरोधात अमेरिकेने पुकारलेल्या लढ्याचा ताळेबंद
ग्रंथ सांगाती (१९९२)
डॉ. झिवागोचा इतिहास (लेख ललित दिवाळी अंक, २०१५)
नेक नामदार गोखले
नौरोजी ते नेहरू (१९६९)[२]
परिक्रमा (१९८७)
पुष्पांजली (व्यक्तिचित्रे, मृत्युलेख संग्रह)
प्रासंगिक
बदलता युरोप (१९९१)
बहार
बाळ गंगाधर टिळक (१९७०)
मंथन
वाचता वाचता (पुस्तक परीक्षणांचा संग्रह, खंड १, २) (१९७९,९२)
शेक्सपियर - वेगळा अभ्यास (लेख - ललित मासिक, जानेवारी २०१६)
सत्तांतर (खंड १-१९७७ , २-१९८३, व ३-१९९७)
सोव्हियत साम्राज्याचा उदय आणि अस्त (खंड १ व २)
पुरस्कार
उत्कृष्ठ पत्रकारितेचे "दुर्गा रतन" व "रामनाथ गोयंका" पुरस्कार
न.चिं केळकर पुरस्कार ("सोव्हिएत साम्राज्याचा उदय आणि अस्त" पुस्तकासाठी)
इ.स. २००७ मध्ये जीवनगौरव पुरस्कार
महाराष्ट्र शासनातर्फे देण्यात येणारा लोकमान्य टिळक पुरस्कार
श्री गोविंदराव तळवलकर यांच्या निधनाने पत्रकारितेतील ऋषीतुल्य व्यक्तिमत्त्व हरपले : मुख्यमंत्री @Dev_Fadnavispic.twitter.com/MtYLCAZ1I1
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) March 22, 2017
Saddened to know about the demise of Govindrao Talwalkar, veteran journalist & political analyst. My sincere condolences to the family. pic.twitter.com/E6g1voygFg
— Sharad Pawar (@PawarSpeaks) March 22, 2017