ज्येष्ठ साहित्यिक वामन होवाळ यांचे निधन

By Admin | Published: December 24, 2016 04:55 AM2016-12-24T04:55:12+5:302016-12-24T04:55:12+5:30

ज्येष्ठ साहित्यिक, कथाकथनकार वामन होवाळ यांचे शुक्रवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ८१ वर्षांचे होते.

Veteran literary Vaman Hawal passed away | ज्येष्ठ साहित्यिक वामन होवाळ यांचे निधन

ज्येष्ठ साहित्यिक वामन होवाळ यांचे निधन

googlenewsNext

मुंबई : ज्येष्ठ साहित्यिक, कथाकथनकार वामन होवाळ यांचे शुक्रवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ८१ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले आणि मुलगी, स्नुषा, जावई असा परिवार आहे.
मूळचे सांगलीचे असलेले वामन होवाळ यांनी उच्च शिक्षण मुंबईत घेतले. दलित ग्रामीण विश्वाचे प्रत्यंकारी चित्रण त्यांनी रेखाटले. कधी कोपरखळ्या मारत, प्रसंगी चिमटे काढत वास्तव मांडणारे हे लेखन वाचकाला अंतर्मुख करणारे होते. मुंबईतल्या झोपडपट्टीतील वास्तव त्यांनी प्रखरतेने मांडले. कथालक्ष्मीच्या अंकात प्रसिद्ध झालेली त्यांची माणूस (१९५३) ही पहिली कथा विशेष गाजली. शिवाय बेनवाड, येळकोट, वारसदार हे त्यांचे कथासंग्रहदेखील गाजले. आंधळ्याची वरात बहिऱ्याच्या घरात, जपून पेरा बेणं या लोकनाट्याने रसिकांच्या मनात त्यांनी अढळ स्थान निर्माण केले. त्यांनी कथाकथनाचे कार्यक्रमही केले. आपल्या खास शैलीत ते कथा सांगू लागले की, प्रेक्षक त्यात रंगून जात असत. शंकर पाटील, द. मा. मिरासदार, माडगुळकर यांच्या नंतरच्या पिढीतील कथाकथनकार अशी त्यांची ओळख होती. वामन होवाळ यांच्या मजल्याचं घर, पाऊसपाणी या कथांचे इंग्रजी आणि फ्रेंच भाषेत अनुवाद झाले असून आंबेडकरी साहित्य चळवळीमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता.(प्रतिनिधी)
हरहुन्नरी माणूस हरपला
साहित्य विश्वाचा आढावा घेणारे, विशेष म्हणजे तरुण पिढी काय लिखाण करते याकडे बारकाईने लक्ष देणारे वामन होवाळ होते. आमची जुनी मैत्री होती. राहायला देखील जवळ असल्याने आमची भेट ही नित्याचीच होती. शुक्रवारी दुपारी ३ वाजता झालेल्या भेटीत त्यांच्या प्रकृतीबाबत चर्चा झाली. रुग्णालयात जात असतानाच त्यांचे निधन झाले. दहा-बारा वर्षांपूर्वी त्यांची बायपास सर्जरी झालेली होती. आंबेडकरी साहित्य चळवळीबद्दल ते नेहमी सकारात्मक भुमिका मांडायचे. बोधी नाट्य परिषदेत देखील त्यांनी उपस्थिती लावली होती. जुन्या काळात वग, लोकनाट्यांचे लिखाण, सदाशिव अमरापूरकर यांच्या चित्रपटात त्यांनी पोलिसाची भुमिका केली होती. एकंदरीत वामन होवाळ यांच्या निधनाने साहित्य विश्वातील हरहुन्नरी माणूस हरपला.
- प्रेमांनद गज्वी, ज्येष्ठ साहित्यिक आणि नाटककार

Web Title: Veteran literary Vaman Hawal passed away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.