Maharashtra Politics: एकनाथ शिंदेसमोरच शरद पोंक्षेंनी सांगितली बाळासाहेबांची ‘ती’ आठवण; म्हणाले, “हीच खरी शिवसेना”

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2022 12:41 PM2022-10-25T12:41:14+5:302022-10-25T12:43:10+5:30

मी नथुराम गोडसे बोलतोय नाटकाच्या पाठी बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे ठामपणे उभे राहिले होते, असे सांगत शरद पोंक्षेंनी आठवणींना उजाळा दिला.

veteran marathi actor sharad ponkshe memorised balasaheb thackeray and said balasahebanchi shivsena shinde group is original | Maharashtra Politics: एकनाथ शिंदेसमोरच शरद पोंक्षेंनी सांगितली बाळासाहेबांची ‘ती’ आठवण; म्हणाले, “हीच खरी शिवसेना”

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेसमोरच शरद पोंक्षेंनी सांगितली बाळासाहेबांची ‘ती’ आठवण; म्हणाले, “हीच खरी शिवसेना”

googlenewsNext

Maharashtra Politics:एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडखोरी केल्यापासून शिवसेनेत दोन गट पडले. शिवसेनेचे नाव आणि निवडणूक चिन्ह गोठवल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि बाळासाहेबांची शिवसेना हा शिंदे गट असे दोन गट झाले असून, शिंदे गटाला राज्यभरातून मोठा पाठिंबा मिळत आहे. यातच सिनेसृष्टीतील अनेकांनी एकनाथ शिंदे यांचे समर्थन केले आहे. त्यापैकी एक म्हणजे ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे (Sharad Ponkshe). एका कार्यक्रमात बोलताना शरद पोंक्षे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोरच शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची एक आठवण सांगत, एकनाथ शिंदेची शिवसेना हीच खरी बाळासाहेबांची शिवसेना असल्याचे म्हटले आहे. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गडकरी रंगायतन येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘रंगात रंगली दिवाळी’ या दिवाळी पहाट कार्यक्रमाला उपस्थित राहून नागरिकांशी संवाद साधला. यावेळी ‘रंगाई’ या खास दिवाळी अंकाचे प्रकाशन करण्यात आले. या कार्यक्रमात शरद पोंक्षे यांनी बाळासाहेबांच्या काही आठवणींना उजाळा दिला. कोरोनाच्या काळात २०२१ मध्ये माझ्या आयुष्यातील पहिलं पुस्तक ‘मी आणि नथुराम’ प्रकाशित झाले. ‘मी नथुराम गोडसे’ नाटक करत असताना बाळासाहेब ठाकरे ठामपणे नथुरामच्या पाठीशी उभे राहिले होते. १७ जुलै १९९८ रोजी त्यांनी ‘नथुराम बोलला तर काँग्रेसच्या पोटात का दुखतं?’ असा अग्रलेख ‘सामना’त लिहिला होता. तो अग्रलेख या पुस्तकात छापण्यात आला आहे, असे शरद पोंक्षे यांनी सांगितले. 

खऱ्या अर्थाने बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जात आहेत

ती बाळासाहेबांची शिवसेना आणि त्याचे आजचे प्रमुख, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. हे खऱ्या अर्थाने बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जात आहेत. पुस्तकात आनंद दिघे कसे पाठीशी उभे राहिले, बाळासाहेबांनी ती लढाई कशी लढली आणि आमचे नाटक केंद्र सरकारविरोधातील लढाईत कसे जिंकले याचे अनंत किस्से आहेत, असे नमूद करत, मी काही लेखक नाही, त्यामुळे माझे पुस्तक कोणी वाचेल असे वाटले नव्हते. पण हे बेस्ट सेलर पुस्तक ठरले. दिवाळीपर्यंत १० आवृत्त्या संपल्या आहेत, असे शरद पोंक्षे म्हणाले.

दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी यावेळी बोलताना, आपले सगळे काही समोर असते. दिवाळीचे फटाके फुटत आहेत, पण आम्ही तीन महिन्यांपूर्वीच फटाके फोडले आहेत. त्याचा आवाज आजही घुमतोय. आमचे हितचिंतक त्या फटक्याच्या आवाजांचे डेसिबल आजही मोजत आहेत. त्यांनी मोजू देत, काही समस्या नाही, असा टोला लगावला. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: veteran marathi actor sharad ponkshe memorised balasaheb thackeray and said balasahebanchi shivsena shinde group is original

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.