ज्येष्ठ मराठी साहित्यिक, दूरदर्शनचे माजी वृत्त निवेदक अनंत भावे यांचं निधन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2025 23:34 IST2025-02-23T23:31:58+5:302025-02-23T23:34:34+5:30

Anant Bhave Passes Away: ज्येष्ठ साहित्यिक आणि दूरदर्शनवरील माजी वृत्त निवेदक प्रा. अनंत भावे यांच आज निधन झालं. ते ८८ वर्षांचे होते. सध्या ते पुण्यातील बाणेर परिसरात वास्तव्यास होते. तिथेच त्यांचं निधन झालं.

Veteran Marathi writer and former Doordarshan news anchor Anant Bhave passes away | ज्येष्ठ मराठी साहित्यिक, दूरदर्शनचे माजी वृत्त निवेदक अनंत भावे यांचं निधन 

ज्येष्ठ मराठी साहित्यिक, दूरदर्शनचे माजी वृत्त निवेदक अनंत भावे यांचं निधन 

पुणे - ज्येष्ठ साहित्यिक आणि दूरदर्शनवरील माजी वृत्त निवेदक प्रा. अनंत भावे यांच आज निधन झालं. ते ८८ वर्षांचे होते. सध्या ते पुण्यातील बाणेर परिसरात वास्तव्यास होते. तिथेच त्यांचं निधन झालं.

प्रा. अनंत भावे यांनी माणूस साप्ताहिकामधून स्तंभलेखन केलं होतं. तसेच त्यांनी मुंबईतील सोमय्या महाविद्यालयामध्ये मराठी विषयाचे प्राध्यापक म्हणून काम केलं होतं. पुढे दूरदर्शनवर वृत्तनिवेदक म्हणून त्यांनी काम केले. त्यांच्या वृत्तनिवेदनाच्या खास शैलीमुळे ते प्रसिद्ध झाले होते.

अनंत भावे यांनी मराठीतील बाल साहित्याला दिलेलं योगदान हे विशेष असं आहे. त्यांनी लहान मुलांसाठी कथा, कवितांची अनेक पुस्तकांचं लेखन केलं होतं. बालसाहित्यामधील योगदानासाठी त्यांना २०१३ साली साहित्य अकादमीचा पुरस्कारही मिळाला होता.

अनंत भावे यांच्या पत्नी प्रा. पुष्पा भावे ह्या मराठीतील प्रख्यात समीक्षक आणि समाजसेविका होत्या. पुष्पा भावे यांचं २०२० मध्ये निधन झालं होतं. पुष्पा भावे यांच्या निधनानंतर अनंत भावे यांनी सामाजित क्षेत्रामधील आपला सहभाग कमी केला होता. तसेच अखेरच्या काळात ते पुण्यातील बाणेर येथे वास्तव्यास गेले होते.    

Web Title: Veteran Marathi writer and former Doordarshan news anchor Anant Bhave passes away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.