ज्येष्ठ नाटककार जयंत पवार काळाच्या पडद्याआड
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2021 07:41 AM2021-08-29T07:41:46+5:302021-08-29T07:57:29+5:30
Jayant Pawar : 'फिनिक्सच्या राखेतून उठला मोर' या कथासंग्रहासाठी जयंत पवार यांना 2012 मध्ये साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
मुंबई : प्रसिद्ध नाटककार जयंत पवार यांचे निधन झाले आहे. ते 61 वर्षांचे होते. मराठी भाषेतील एक विचारी, साक्षेपी आणि संवेदनशील लेखक म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या निधनामुळे नाट्य क्षेत्रासह सगळीकडेच शोककळा पसरली आहे.
'फिनिक्सच्या राखेतून उठला मोर' या कथासंग्रहासाठी जयंत पवार यांना 2012 मध्ये साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने घेतलेल्या नाट्यलेखन स्पर्धेत ‘काय डेंजर वारा सुटलाय’ या नाटकासाठी जयंत पवार यांना सर्वोत्कृष्ट लेखनाचे प्रथम पारितोषिक मिळाले होते.
अधांतर हे नाटक खूप गाजले होते. 2014 साली जानेवारी महिन्यात महाड येथे झालेल्या 15व्या कोकण मराठी साहित्य परिषदेच्या साहित्य संमेलनाचे जयंत पवार हे अध्यक्ष होते.
जयंत पवार यांची साहित्य संपदा!
- अधांतर
- काय डेंजर वारा सुटलाय
- टेंगशेच्या स्वप्नात ट्रेन (दीर्घांक)
- दरवेशी (एकांकिका)
- पाऊलखुणा (वंश या नाटकाचे व्यावसायिक रूप)
- फिनिक्सच्या राखेतून उठला मोर (कथासंग्रह)
- बहुजन संस्कृतिवाद आणि लेखक (भा़ाषाविषयक)
- माझे घर
- वरनभातलोन्चा नि कोन नाय कोन्चा (कथासंग्रह)
- वंश
- शेवटच्या बीभत्साचे गाणे (दीर्घांक)
- होड्या (एकांकिका)