ज्येष्ठ कवी विद्याधर करंदीकर यांचे निधन
By admin | Published: October 2, 2016 01:07 AM2016-10-02T01:07:23+5:302016-10-02T01:07:23+5:30
ज्येष्ठ कवी डॉ. विद्याधर करंदीकर (वय ५९) यांचे शनिवारी येथे निधन झाले. हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यानंतर त्यांना शुक्रवारी रात्री कणकवली येथील खासगी रुग्णालयात
कणकवली (सिंधुदुर्ग) : ज्येष्ठ कवी डॉ. विद्याधर करंदीकर (वय ५९) यांचे शनिवारी येथे निधन झाले. हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यानंतर त्यांना शुक्रवारी रात्री कणकवली येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या प्रकृतीमध्ये थोडी सुधारणा होते असे वाटल्यावर त्यांना शनिवारी अधिक उपचारासाठी कोल्हापूर येथे हलवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, त्यापूर्वीच त्यांचे सकाळी ११ वाजता निधन झाले. कवी, बालनाटककार, मराठी आणि संस्कृत भाषेचे गाढे अभ्यासक असलेले डॉ. करंदीकर यांचा जन्म २ नोव्हेंबर १९५८ रोजी झाला. ते कणकवली येथे दंतवैद्यक होते. मराठी आणि संस्कृत भाषेचे जाणकार असलेले डॉ. करंदीकर हे अनेकांचे चालताबोलता संदर्भग्रंथ होते. ‘मराठी कवीची नाट्यसृष्टी - स्वरूप विशेष’ यावरील प्रबंधाला त्यांना पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली होती. (प्रतिनिधी)