शरद पवारांच्या 'वटवृक्ष'ला विहिंपचा विरोध; निवडणूक आयोग कोणता निर्णय घेणार...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2024 07:07 PM2024-02-08T19:07:46+5:302024-02-08T19:15:08+5:30

शरद पवारांना वटवृक्ष हे चिन्ह हवे आहे. तर शरद पवार गटाला नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार असे नाव देण्यात आले आहे.

VHP opposes Sharad Pawar's 'vat vruksh' ncp Party Symbol; What decision will the Election Commission take? | शरद पवारांच्या 'वटवृक्ष'ला विहिंपचा विरोध; निवडणूक आयोग कोणता निर्णय घेणार...

शरद पवारांच्या 'वटवृक्ष'ला विहिंपचा विरोध; निवडणूक आयोग कोणता निर्णय घेणार...

निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी कोणाची, घड्याळ चिन्ह कोणाचे याचा निर्णय देतानाच शरद पवार गटाला राज्यसभा निवडणुकीसाठी पक्षाचे नाव आणि चिन्ह सुचविण्यास सांगितले होते. यानुसार शरद पवार गटाने काही पर्याय दिले होते. यापैकी एक नाव शरद पवार यांच्या पक्षाला देण्यात आले आहे. तर पक्षाच्या चिन्हाबाबत अजून निर्णय झालेला नाहीय. 

शरद पवारांना वटवृक्ष हे चिन्ह हवे आहे. तर शरद पवार गटाला नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार असे नाव देण्यात आले आहे. परंतु, अद्याप पक्षचिन्ह ठरलेले नाहीय. राज्यसभा निवडणुकीला पक्षचिन्ह लागणार नसल्याने शरद पवार गटाने त्याचे प्रस्ताव दिले नसल्याचे सांगितले जात असले तरी पवार हे वटवृक्ष चिन्ह मिळावे यासाठी आग्रही असल्याचे सांगितले जात आहे. 

याला विश्व हिंदू परिषदेने विरोध केला आहे. वटवृक्ष हे चिन्ह विश्व हिंदू परिषद संघटनेचे अधिकृत चिन्ह आहे आणि ते नोंदणीकृत असल्याचे म्हटले आहे. यामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीला देण्यास विहिंपने आक्षेप घेतला आहे. यामुळे आता निवडणूक आयोग कोणता निर्णय घेणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

दुसरीकडे शरद पवारांनी उगवता सूर्य आणि काचेचा ग्लास अशा चिन्हांचा प्रस्ताव दिल्याचे वृत्त काही वृत्तवाहिन्यांनी दिले आहे. जर ही चिन्हे मागितली असतील तर वटवृक्षाचा पर्याय उपलब्ध नसल्यास या दोन चिन्हांपैकी एक दिले जाण्याची शक्यता आहे. विहिंप देखील निवडणुका लढवत असते. प्रविण तोगडिया हे देखील अनेकदा निवडणूक लढवत असतात. यामुळे विहिंपने हे चिन्ह पवारांना देण्यास आक्षेप घेतला आहे.

Web Title: VHP opposes Sharad Pawar's 'vat vruksh' ncp Party Symbol; What decision will the Election Commission take?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.