विकोचे संजीव पेंढरकर यांना पुरस्कार
By admin | Published: September 23, 2015 01:04 AM2015-09-23T01:04:52+5:302015-09-23T01:04:52+5:30
मुंबईस्थित ‘पेटा’ या संस्थेकडून विको लेबॉरेटरिजच्या आयुर्वेदिक उत्पादनांकरिता नुकताच ‘कॉम्पॅसिओनेट बिझनेस’ हा पुरस्कार देण्यात आला आहे
नागपूर : मुंबईस्थित ‘पेटा’ या संस्थेकडून विको लेबॉरेटरिजच्या आयुर्वेदिक उत्पादनांकरिता नुकताच ‘कॉम्पॅसिओनेट बिझनेस’ हा पुरस्कार देण्यात आला आहे. याप्रसंगी विको लेबॉरेटरिजचे संचालक संजीव पेंढरकर म्हणाले, आमचे ग्राहक हे उत्पादनांच्या गुणवत्तेसाठी अतिशय जागरूक आहेत आणि म्हणूनच आम्हीसुद्धा आमच्या उत्पादनांच्या गुणवत्तेविषयी तेवढेच जागरूक आहोत.
‘पेटा’ या संस्थेच्या अधिकाऱ्यांद्वारे उत्पादनांचे सखोल परीक्षण केल्यानंतर विको लेबॉरेटरिजला हा पुरस्कार मिळाला असून हा पुरस्कार दोन वर्षांच्या अवधीकरिता ग्राह्य धरला जाईल. हा पुरस्कार मिळणे हाच आमच्याकरिता मोठा सन्मान असल्याचे पेंढरकर म्हणाले. मुंबई येथे ‘पेटा’ ही संस्था कार्यरत आहे. मुक्या प्राण्यांप्रति अनुकंपा बाळगून त्यांना संवेदनात्मक वागणूक मिळवून देणाऱ्या लोकांची ही संस्था असून अशा लोकांकरिताच ही संस्था कार्य करीत आहे. खाद्यान्न आणि लेदर उद्योगात प्रयोगशाळांमध्ये तसेच ज्या ठिकाणी लोकांना मनोरंजनाकरिता म्हणून जनावरांचा गैरवापर मोठ्या प्रमाणात केला जातो. प्राण्यांवर होणाऱ्या अत्याचाराची ठिकाणं ‘पेटा’ शोधून काढते आणि तेथील लोकांना भूतदयेविषयी जागरूक करण्याचे कार्य करते. संस्थेने सर्कसमध्ये वापरण्यात येणाऱ्या प्राण्यांनाही वाचविले आहे.
‘पेटा’ या संस्थेशी अनेक नावे जुळली आहेत. ज्यामध्ये प्रामुख्याने जॉन अब्राहम, शाहीद कपूर, शिल्पा शेट्टी कुंद्रा, दिलीपकुमार, हेमामालिनी, शत्रुघ्न सिन्हा, मलायका अरोरा यांचा समावेश आहे. (वा.प्र.)