विद्यार्थी संघटनेच्या निशाण्यावर कुलगुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2017 04:50 AM2017-08-02T04:50:28+5:302017-08-02T04:50:43+5:30

आॅगस्ट महिना उजाडल्यावरही मुंबई विद्यापीठाची उत्तरपत्रिका तपासणी पूर्ण झालेली नाही. कुलगुरूंनी आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासणीचा निर्णय घेतल्यामुळे

Vice Chancellor on the lines of the student organization | विद्यार्थी संघटनेच्या निशाण्यावर कुलगुरू

विद्यार्थी संघटनेच्या निशाण्यावर कुलगुरू

Next

मुंबई : आॅगस्ट महिना उजाडल्यावरही मुंबई विद्यापीठाची उत्तरपत्रिका तपासणी पूर्ण झालेली नाही. कुलगुरूंनी आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासणीचा निर्णय घेतल्यामुळे, ही वेळ आल्याचे विद्यार्थी संघटनांचे म्हणणे आहे. त्यामुळे विद्यार्थी संघटना सक्रिय झाल्या असून, मंगळवारी तीन संघटनांनी आंदोलन केले.
लाखो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने, मंगळवारी दुपारी युवासेनेच्या शिष्टमंडळाने कुलगुरूंची भेट घेतली. युवासेनेने कलिना कॅम्पसमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनासमोर घोषणाबाजी केली. त्यानंतर, युवासेनेचे शिष्टमंडळ कुलगुरूंच्या भेटीला गेले. परदेशात पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी जाऊ इच्छिणा-या अथवा नोकरी मिळालेल्या विद्यार्थ्यांची, निकाल जाहीर न झाल्याने कोंडी झाली आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांसाठी हेल्प डेस्क करावा, अशी मागणी केली. या मागणीला कुलगुरूंनी मान्यता दिली असून, हेल्प डेस्क सुरू करण्यात आल्याची माहिती सिनेटचे माजी सदस्य युवासेनेचे नेते प्रदीप सावंत यांनी दिली.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने (अभाविप) विधान भवनाबाहेर निदर्शने केली. आंदोलन करणाºया विद्यार्थ्यांना पोलिसांनी पकडले आणि संध्याकाळी
सोडून दिले. अभाविपने सोमवारी कलिना कॅम्पसमध्ये आंदोलन केले होते, त्या वेळी पोलिसांनी विद्यार्थ्यांना पकडले होते. घोषणाबाजी करत मंगळवारी अभाविपने आंदोलन
केले.
विद्यापीठाच्या फोर्ट कॅम्पसमध्ये मंगळवारी दुपारी स्टुडंट फेडरेशन आॅफ इंडियाने ( एसएफआय) आंदोलन केले. विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान लक्षात घेऊन हे आंदोलन करण्यात आले होते. ४५ दिवसांत निकाल जाहीर करण्याचा नियम विद्यापीठाने पायदळी तुडवला आहे. त्यामुळे कडक शासन व्हावे, अशी एसएफआयचे म्हणणे आहे.
आज कलिना कॅम्पस दणाणणार -
कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांच्या निर्णयामुळे लाखो विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे आता सर्वच विद्यार्थी संघटना सक्रिय झाल्या आहेत. बुधवारी फोर्ट कॅम्पसमध्ये आदित्य शिरोडकर यांच्या नेतृत्वाखाली, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना, संजय निरुपम यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस आणि स्टुडंट फेडरेशन आॅफ इंडिया आंदोलन करणार आहेत.
विद्यार्थी संघटनांच्या प्रमुख मागण्या : शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी राजीनामा द्यावा, कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांनी राजीनामा द्यावा,पुनर्मूल्यांकन मोफत करून द्यावे,विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, याची जबाबदारी विद्यापीठाने घ्यावी.
मंगळवार अखेर एकूण १७ लाख ७६ हजार ६९९ उत्तरपत्रिकांपैकी १४ लाख ७८ हजार ४५२ उत्तरपत्रिका तपासून झाल्या असून अद्याप २ लाख ९८ हजार २१३ उत्तरपत्रिका शिल्लक आहेत.
शिक्षणमंत्र्यांची घेतली भेट
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या शिष्टमंडळाने मंगळवारी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची विधानभवन परिसरात भेट घेतली. या वेळी विद्यापीठात परीक्षा नियंत्रक पदावर सनदी अधिकारी नियुक्त करण्याबाबत विचार करण्यात येईल. उत्तरपत्रिकांच्या पुनर्मूल्यांकनाचे शुल्क माफ करण्याबाबत सकारात्मक विचार करण्यात येईल, असे आश्वासन तावडे यांनी अभाविपच्या शिष्टमंडळाला दिले.

Web Title: Vice Chancellor on the lines of the student organization

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.