मुंबई विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू राज्यपालांची घेणार भेट
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2017 10:40 AM2017-08-18T10:40:45+5:302017-08-18T10:45:53+5:30
मुंबई विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू राज्यपाल सी.विद्यासागर राव यांची भेट घेणार आहेत. आज सकाळी 11 वाजता प्रभारी कुलगुरू देवानंद शिंदे आणि राज्यपालांमध्ये बैठक होणार आहे.
मुंबई, दि. 18 - मुंबई विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू राज्यपाल सी.विद्यासागर राव यांची भेट घेणार आहेत. आज सकाळी 11 वाजता प्रभारी कुलगुरू देवानंद शिंदे आणि राज्यपालांमध्ये बैठक होणार आहे. या बैठकीत निकालाबाबतच्या परिस्थितीचा आढावा घेतला जाणार असल्याचे बोलले जात आहे.
मुंबई विद्यापीठाच्या कारभारावर चौफेर टीका
मुंबई विद्यापीठाचे निकाल जाहीर करण्यासाठी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी दिलेली 31 जुलैची पहिली डेडलाइन चुकल्यानंतर विद्यापीठाच्या कारभारावर सर्व बाजूंनी टीका करण्यात आली होती. 5 ऑगस्टची दिलेली दुसरी डेडलाइनही विद्यापीठाला पाळता आलेली नाही. 212 अभ्यासक्रमांचे निकाल अद्यापही जाहीर झालेले नाहीत.
वाचा आणखी बातम्या
(गरबा प्रवेशासाठी आधार कार्ड सक्तीचं करा- हिंदू उत्सव समिती)
(नांदेडमध्ये दोन महिन्याच्या मुलीला फेकलं नाल्यात ; महिला फरार)
(धक्कादायक ! काम करण्यास नकार देणा-या दलित महिलेचं कापलं नाक)
यंदा एप्रिल महिन्यात कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांनी सर्व अभ्यासक्रमांच्या उत्तरपत्रिकांची तपासणी ऑनलाइन पद्धतीने करण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार, निविदा प्रक्रिया सुरू केली. मात्र, त्याला अत्यल्प प्रतिसाद मिळूनही ऑनलाइन उत्तरपत्रिका तपासणी सुरू केली. त्यामध्ये आलेल्या तांत्रिक अडचणींमुळे ऑगस्ट महिना उजाडूनही उत्तरपत्रिकांची तपासणी सुरूच आहे. मुंबई विद्यापीठाला सर्व 477 अभ्यासक्रमांचे निकाल 31 जुलैपर्यंत जाहीर करण्याचे आदेश राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी 4 जुलै रोजी दिले होते, पण विद्यापीठाने ही डेडलाइन पाळली नाही. त्यानंतर विद्यापीठाला पाच दिवसांची मुदतवाढ देण्यात आली होती. पण ही डेडलाइनही विद्यापीठ पाळू शकलेले नाहीत.
15 ऑगस्टलाही निकाल चुकलाच
मुंबई विद्यापीठाने स्वत:हून 15 ऑगस्टपर्यंत निकाल जाहीर होतील, असे स्पष्ट केले होते. मात्र, 15 ऑगस्टलादेखील निकाल लागू शकलेले नाहीत. त्यामुळे विद्यापीठाच्या कारभारावर चौफेर टीका केली जात आहे.