उपमुख्याधिका:यास लाच घेताना अटक

By admin | Published: June 5, 2014 01:20 AM2014-06-05T01:20:28+5:302014-06-05T01:20:28+5:30

तक्रारदाराकडूनच लाच मागण्याच्या या प्रकारामुळे पालिकेतील अधिकारी अनधिकृत बांधकामाच्या नावावर कशा प्रकारे पैसे उकळतात, हे उघड झाले आहे.

Vice President: They are arrested while taking bribe | उपमुख्याधिका:यास लाच घेताना अटक

उपमुख्याधिका:यास लाच घेताना अटक

Next
>अंबरनाथ : अनधिकृत गॅरेजवर कारवाईसाठी तक्रारदाराकडेच दोन लाखांची लाच मागणा:या अंबरनाथच्या उपमुख्याधिकारी संग्राम नार्वेकर यांना लाचलुचपतविरोधी पथकाने बुधवारी दुपारी 1.3क् वाजता अटक केली. अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यासाठी तक्रारदाराकडूनच लाच मागण्याच्या या प्रकारामुळे पालिकेतील अधिकारी अनधिकृत बांधकामाच्या नावावर कशा प्रकारे पैसे उकळतात, हे उघड झाले आहे. 
गेल्या महिनाभरापासून पालिकेच्या मुख्याधिकारी निधी चौधरी यांनी अंबरनाथ शहरातील अनधिकृत बांधकामांवर कारवाईचा सपाटा लावून शहरातील बहुसंख्य रस्ते मोकळे केले आहेत. मात्र त्यांच्यासोबत असलेले अधिकारी हे केवळ वैयक्तिक स्वार्थासाठी काम करीत आहेत. चौधरी यांच्यासोबत कारवाईदरम्यान असलेले उपमुख्याधिकारी नार्वेकर हे अनधिकृत बांधकामाच्या नावावर आणि बांधकामे तोडण्यासाठी ‘सुपारी’ घेत असल्याचे उघड झाले आहे. 
1क् मार्च रोजी प्रवीण राणो यांनी नवरेनगर येथील एका सोसायटीच्या आत उभारलेले अनधिकृत गॅरेज तोडण्याची तक्रार केली होती. मात्र गेल्या अडीच महिन्यात त्याच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. सतत पाठपुरावा केल्यावर उपमुख्याधिकारी संग्राम नार्वेकर यांनी राणो यांना गॅरेज तोडण्यासाठी दोन लाख रुपये लागतील, असे सांगितले. तक्रारदाराकडूनच कारवाईसाठी पैसे मागितल्याने राणो अचंबित झाले होते. त्यांनी या प्रकाराची माहिती लाचलुचपत विभागाच्या अधिका:यांना दिली. त्यानुसार नार्वेकर यांच्यावर आनंद विहार सोसायटीच्या परिसरात सापळा रचण्यात आला. 
 
नाव्रेकरचा तपास घेणो सुरू
ज्या गॅरेजवर कारवाई करायची होती, त्या बांधकामाला नगररचना विभागाच्या अधिका:यांनी नोटीस बजावली होती. या प्रकरणात नार्वेकर यांना नगररचना विभागातील अधिका:यांची साथ आहे का, याची चौकशी करण्यात येत आहे. तसेच नार्वेकर यांनी आतार्पयत कोणकोणत्या बांधकामांसाठी पैसे उकळले आहेत, त्याचाही तपास करण्यात येत आहे. 

Web Title: Vice President: They are arrested while taking bribe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.