मद्यधुंद चालकाने घेतला रिक्षाचालकाचा बळी
By admin | Published: July 22, 2016 02:29 AM2016-07-22T02:29:21+5:302016-07-22T02:29:21+5:30
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर ह्लोली पादोस पाड्या जवळ मीरा भार्इंदर महानगरपालिकेची पाटी असलेली कारच्या धडकेने रिक्षाचा अपघात
मनोर : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर ह्लोली पादोस पाड्या जवळ मीरा भार्इंदर महानगरपालिकेची पाटी असलेली कारच्या धडकेने रिक्षाचा अपघात होऊन गंभीर जखमी झालेल्या रिक्षा चालक अबरार उर्फ (पिंट्या) खुर्शीद शेख याचा उपचार सुरु असतांना मृत्यू झाला आहे. त्याच्या मृत्यूची माहिती मिळताच मनोर परिसरात दुखाचे सावट पसरले. अपघातानंतर त्याने दोन दिवस मृत्यूशी दिलेली झुंज अखेर आज संपली.
बुधवारी त्याच्या मृत्यूची वार्ता धडकताच रिक्षा चालकांनी एक दिवस आपल्या रिक्षा बंद ठेवल्या होत्या. मे महिन्यातच रिक्षा चालकाच लग्न झाले होते. कारचालक मद्यधुंद अवस्थेत होता त्या कारमध्ये बिसलरीच्या बाटलीत दारू असल्याची माहिती उजेडात आली आहे.
मनोर पोलीस ठाण्यात अपघाताचे गुन्हा दाखल केला असून आरोपी मोहन वामन वानखेडे यास अटक केले होते. त्यानंतर त्याची सुटका ही करण्यात आली आह. मनोर पोलीस ठाण्याचे हवालदार पवार यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ज्या दिवशी अपघात घडला होता त्या दिवशी अबरार जखमी आहे, अशी गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. मात्र, त्याचे निधन झाल्याने कोर्टाला कळवून कलम वाढवून आरोपीवर कोर्टाच्या आदेशानुसार पुन्हा कारवाई करू. तसेच चालकाचे रक्त नमुने तपासणीसाठी लॅबमध्ये पाठविले आहेत. कारमध्ये प्लास्टिकचे बाटल्या सापडले त्यात दारू होती. तेही चाचणीसाठी पाठविण्यात आले आहे. (वार्ताहर)
>अबरारचा परिवार झाला अनाथ
अबरार हा १६ जुलैला रिक्षा घेऊन जात असताना लोली पाडोस पाडा गावाजवळ त्याच दिशेने मीरा भार्इंदर नगरपालिका अशी पाटी असलेल्या कारचा चालक मोहन वानखेडे याने मद्यधुंद नशेत भरधाव वाहन चालवून रिक्षाला पाठीमागून धडक दिल्याने ती खड्यात पलटी झाली. अबरारला मुंबई येथे रुग्णालयात दाखल केले असता दोन दिवसाने त्याचे निधन झाले. त्याच्या पश्चात त्याची पत्नी, आई वडील, भाऊ असा परिवार आहे.