वन विभागाच्या नाकर्तेपणाचा बळी, बिबट्याच्या हल्ल्यात जखमीचा मृत्यू

By admin | Published: September 7, 2016 01:21 PM2016-09-07T13:21:00+5:302016-09-07T13:21:00+5:30

पालघर जिल्ह्यातील तलासरी येथे बिबट्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या वसंत महादू इरिम याचा पहाटे मृत्यू झाला.

Victim of forest department's nihilism, wounded death by leopard attack | वन विभागाच्या नाकर्तेपणाचा बळी, बिबट्याच्या हल्ल्यात जखमीचा मृत्यू

वन विभागाच्या नाकर्तेपणाचा बळी, बिबट्याच्या हल्ल्यात जखमीचा मृत्यू

Next
>सुरेश काटे, ऑनलाइन लोकमत
पालघर, दि. ७ -  पालघर जिल्ह्यातील तलासरी येथे बिबट्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या वसंत महादू इरिम याचा पहाटे मृत्यू झाला. तलासरी तालुक्यातील आमगाव येथे वसंत इरिम याच्या वर बिबट्याने पंधरा ऑगस्ट रोजी हल्ला केला होता. त्याच्यावर गुजरात मधील सुरत येथील रुग्णालयात उपचार सुरु होते त्याची प्रकृती चिंताजनक झाल्याने त्याला मुंबई येथे हलविण्यात आले होते परंतु त्याचा आज सकाळी मृत्यू झाला.
बिबट्या चा आमगाव भागात धुमाकूळ सुरु असताना गावकऱ्यांनी बोर्डी वन विभागाला सांगूनही सुस्तावलेल्या वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने जंगलात गेलेल्या वसंत वर बिबट्याने हल्ला केला होता.
सर्व बाजूने टीकेची झोड उठताच वन विभागाने या भागात पिंजरे लावले व वसंत इरिम ला एक लाखाची मदत दिली.
हल्ला करणारा बिबट्या कालच वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात जेरबंद झाला होता अन दुर्दवाने आज वसंत इरिम याचा मृत्यू झाला. वसंत इरिम बोर्डी वन विभागाच्या नाकर्तेपणाचा बळी ठरला.

Web Title: Victim of forest department's nihilism, wounded death by leopard attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.