नोटाबंदीचा पुन्हा एक बळी
By admin | Published: March 14, 2017 07:38 PM2017-03-14T19:38:34+5:302017-03-14T19:38:34+5:30
बॅंकेत नोटबंदीची झळ अजूनही सुरु असल्याने निवृत्ती वेतन काढण्यासाठी सारखे हेलपाटे मारुन आणि उन्हात लांबच्या लांब रांगेत उभ राहुन
Next
>ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. 14 - बॅंकेत नोटबंदीची झळ अजूनही सुरु असल्याने निवृत्ती वेतन काढण्यासाठी सारखे हेलपाटे मारुन आणि उन्हात लांबच्या लांब रांगेत उभ राहुन आज सोलापूरातील निवृत्त विडी कामगार महिलेचा बॅकेच्या दारातच मृत्यू झाला.
यल्लवा दिगंबर बत्तूल (वय ६० रा. गोदूताई विडी घरकुल) असे मृत पावलेल्या महिलेचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की यल्लव्वा बत्तूल या शिवाजी विडी कारखान्यातून निवृत्त झाल्या होत्या गेल्या चार महिन्यापासून नोटमंदी मुळे त्यांचे वेतन वेळेत व पूर्ण होत नव्हते. या महिन्यातील निवृत्ती वेतनासाठी त्या गेल्या चार दिवसापूर्वी शोक चौक येथील बॅंकेत चक्कर मारत होते पण नोटमंदी मुळे त्याना रक्कम मिळत नव्हती आजही त्या सकाळी अकराच्या सुमारास बॅंकेत आल्या मात्र एक वाजेपर्यंत त्याना रांगेमुळे उन्हात ताटकळत उभे तहावे लागले. त्याना पैसे मिळाले मात्र बाहेर येताच प्रचंड थकव्याने त्याखाली कोसळल्या. त्याना नागरिकानी शासकीय रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरानी त्याना मृत घोषित केले.