दोन दिवसाआड एकाचा बळी

By admin | Published: April 29, 2015 10:15 PM2015-04-29T22:15:14+5:302015-04-30T00:30:34+5:30

रत्नागिरी जिल्हा : पाच वर्षात अपघातांमुळे ९०० मृत्यू

The victim of one day or two | दोन दिवसाआड एकाचा बळी

दोन दिवसाआड एकाचा बळी

Next

प्रकाश वराडकर -रत्नागिरी --रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या सव्वापाच वर्षांत झालेल्या एकूण ४५७७ रस्ते अपघातात ९०० जणांचा बळी गेला असून त्यात ७३८ पुरुष व १६२ महिलांचा समावेश आहे. मुंबई-गोवा महामार्गावर २०१३ या वर्षाच्या तुलनेत २०१४ मध्ये अपघातांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळेच मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण लवकरात लवकर होण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. चौपदरीकरणानंतर महामार्गावरील अपघात कमी होऊन जीवितहानीचे प्रमाणही कमी होणार आहे.
२०१० मध्ये मुंबई-गोवा महामार्गावर झालेल्या ७८ प्राणांतिक अपघातांत ९१ पुरुष व १७ महिला मिळून १०८ जणांचा मृत्यू झाला होता. २०११ मध्ये महामार्गावर ६९ अपघातात ७१ पुरुष व १६ महिलांसह ८७ जण दगावले होते. २०१२ मध्ये ८१ अपघातांत ८४ पुरुष व १७ महिलांसह १०१ जणांचा बळी गेला. २०१३ मध्ये ७४ अपघातात १०८ पुरुष व २२ महिला मिळून १३० जण मृत्यूमुखी पडले होते. २०१४ मध्ये महामार्गावर झालेल्या ९२ अपघातांत ८७ पुरुष, २३ महिलांसह ११० जणांचा मृत्यू झाला होता. जानेवारी २०१५ ते ३१ मार्च २०१५ या तीन महिन्यांच्या काळात महामार्गावर १४ प्राणांतिक अपघातात १५ पुरुष व ३ महिलांसह १८ जण दगावले आहेत. आता त्यात त्यात आज बुधवारी राजापूरमध्ये झालेल्या अपघातातील चार बळींची वाढ झाली आहे.
जिल्ह्यात गंभीर दुखापत झालेल्या रस्ते अपघातांची संख्याही मोठी आहे. २०१० मध्ये जिल्ह्यात दुखापत असलेले १८६ अपघात झाले. त्यात ४१४ जण गंभीर जखमी झाले. २०११ मध्ये १८० गंभीर अपघातात ३९९ जण जखमी झाले. २०१२ मध्ये १७६ गंभीर अपघातात ३९६ जण जखमी झाले. २०१३ मध्ये २०२ अपघातात ३९१ जण जखमी झाले. २०१४ मध्ये २०५ गंभीर अपघातात ५६५ जण जखमी झाले.
जानेवारी ते मार्च २०१५ या तीन महिन्यात ६९ गंभीर अपघातात १२२ जण जखमी झाले. मुंबई गोवा महामार्ग हा आता ‘हायवे’ ऐवजी ‘डायवे’ होऊ लागल्याने वाहनचालकांत चिंता पसरली आहे.


चौपदरीकरणापुढे अडथळा शर्यत
गेल्या पाच वर्षांचा जिल्ह्यातील अपघातांचा आढावा घेता रस्ते अपघातात मोठी वाढ झाली आहे. वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून त्यामुळे रस्ते अपुरे पडू लागले आहेत. तसेच गेल्या अनेक दशकांपासून मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाचा विषय रखडला होता. आता गेल्या सहा महिन्यांपासून या विषयाला चालना मिळाली आहे. मात्र, चौपदरीकरणाच्या जमिन मोजणी प्रक्रियेत अनेक अडथळे निर्माण होत असल्याने चौपदरीकरणाचे काम मंजूर असले तरी ते पूर्ण होण्यासाठी किती काळ लागणार, असा प्रश्नही निर्माण झाला आहे.



मुंबई-गोवा महामार्ग हा अनेक ठिकाणी अरूंद आहे. महामार्ग अरूंद असला तरीही बाहेरून येणारे वाहनचालक वेगाने गाडी चालवतात. विशेष म्हणजे या वाहनचालकांना रस्त्याची, रस्त्यावरील मोठमोठ्या वळणांची काहीच माहिती नसते. त्यातच अरूंद रस्ता असल्याने अपघात होतात आणि या अपघातांची तीव्रताही मोठी असते. त्यामुळे अपघातात जिवितहानी होण्याचे प्रमाण वाढले असल्याचे दिसून येते. सध्या महामार्गावर अवजड वाहतुकीचाही बोजा आहे.



वर्ष अपघात मृत्यू मृत्यू एकूण
(पुरुष)(महिला)मृत्यू
२०१५१४१५३१८
(जानेवारी ते मार्च २०१५)
२०१४९२८७२३११०
२0१३७४१०८२२१३०
२0१२८१८४१७१०१
२०११८९७११६८७
२०१०७८९११७१०८

Web Title: The victim of one day or two

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.