विदर्भात अकोला सर्वाधिक ‘हॉट’!
By admin | Published: May 5, 2016 02:55 AM2016-05-05T02:55:06+5:302016-05-05T03:04:46+5:30
गत काही दिवसांपासून अकोल्यात सातत्याने तापमानात वाढ नोंदविली जात आहे
अकोला: यंदाच्या उन्हाळ्य़ात अकोल्यातील आणखी एका ह्यहॉटह्ण दिवसाची नोंद बुधवारी झाली. ४४.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करून, अकोला विदर्भातील सर्वाधिक उष्ण शहर ठरले.
गत काही दिवसांपासून सातत्याने तापमानात वाढ आणि घट नोंदविली जात आहे. गत आठवड्यात शुक्रवार आणि रविवारी पारा ४५ अंश सेल्सिअसवर पोहोचला होता. त्यानंतर पारा ४४ अंशाच्या खाली आला. बुधवारी मात्र तापमानात पुन्हा वाढ नोंदविली गेली. बुधवारी अकोल्यातील तापमान ४४.१ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. हे विदर्भातील सर्वाधिक तापमान होते.
बुधवारी नोंदविले गेलेले तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)
पश्चिम विदर्भ
अकोला ४४.१
अमरावती ४२.0
यवतमाळ ४१.४
वाशिम ३८.८
बुलडाणा ४१.५
पूर्व विदर्भ
वर्धा ४२.४
नागपूर ४१.९
चंद्रपूर ४१.२
गोंदिया ४१.६