विदर्भात कापूस ते कापड प्रकल्पांची उभारणी!
By admin | Published: November 7, 2015 03:11 AM2015-11-07T03:11:34+5:302015-11-07T03:11:34+5:30
विदर्भात ५८ प्रकल्प; अकोला जिल्हय़ात बाळापूर तालुक्यात टेक्सटाइल पार्कची उभारणी
राजरत्न सिरसाट/अकोला : कापूस ते कापड वस्त्रोद्योगांना चालना देण्यासाठी राज्यभरात ५११ प्रकल्प प्रस्तावित करण्यात आले असून, विदर्भात ५९ प्रकल्पांची उभारणी केली जात आहे. अकोला जिल्हय़ात बाळापूर तालुक्यात टेक्सटाइल पार्कची उभारणी केली जाण्याची शक्यता असल्याने, त्या दृष्टीने पावले उचलली जात आहेत. या सर्व प्रकल्पांसाठी विदर्भात साडेचार हजार कोटींवर गुंतवणूक केली जाणार आहे. या प्रकल्पाच्या उभारणीनंतर राज्यात ११ लाख रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट साध्य होणार आहे.
पार्श्वभूमीवर वस्त्रोद्योगांना चालना देण्यासाठी २0११ पासून राबविलेल्या धोरणांची अंमलबजावणी करण्यावर राज्य शासनाने भर दिला आहे.विदर्भात ११ जिल्हय़ांत वस्त्रोद्योगाचे जाळे विणून ५ लाख नवीन रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट ठेवले आहे. राज्य शासनाच्या वस्त्रोद्योग संचालनालयाने २0११ ते २0१७ या पाच वर्षांकरिता हे धोरण आखले असून, वस्त्रोद्योग क्षेत्रात ४0 हजार कोटींची गुंतवणूक केली आहे. यासाठी वस्त्रोद्योग संचालनालय परिसंवादाच्या माध्यमातून उद्योजकांना प्रोत्साहन देत आहे.
ह्यराज्य शासनाचे नवीन वस्त्रोद्योग धोरणह्ण या विषयावर शुक्रवार, ६ नोव्हेंबर रोजी अकोल्यात परिसंवाद घेण्यात आला. या परिसंवादात राज्यभरातील उद्योजकांची उपस्थिती होती. विदर्भातील उद्योजकांना येणार्या विविध अडचणींवर यावेळी चर्चा झाली. राज्य शासनाने ह्यमेक इन महाराष्ट्रह्ण धोरण आखले असून, त्या दृष्टीने पावले उचलली जात आहेत. या धोरणांतर्गत राबविण्यात येणार्या योजनांमध्ये विदर्भ, मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रातील नवीन वस्त्रोद्योग प्रकल्पांना १0 टक्के भांडवली अनुदान देण्यात आले आहे. केंद्र पुरस्कृत टफ योजनेशी निगडित दीर्घ मुदती कर्जावरील व्याजात सवलत, अनुसूचित जाती, जमाती व अल्पसंख्याक समाजाच्या अस्तित्वातील यंत्रमाग घटकाच्या आधुनिकीकरणासाठी १0 टक्के भांडवली अनुदान, वस्त्रोद्योग संकुलांना ९ कोटी किंवा ९ टक्के अर्थसहाय्य दिले जाईल. विदर्भ, मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रातील सध्याच्या आकृतीबंधाप्रमाणे अर्थसहाय्य, कौशल्य विकास, यंत्रमाग कामगारांसाठी घरकुल, कामगार कल्याण इत्यादी योजना आहेत.
व्याज अनुदान योजनेंतर्गत मंजूर अर्थसाहाय्य
विभाग प्रस्ताव मंजूर अर्थसाहाय्य
(रु. लाखांत)
विदर्भ ३८ २५५८.११
मराठवाडा ३९ २५९.४४
उत्तर महाराष्ट्र ६६ ८५२.७२
उर्वरित महाराष्ट्र २३३ ६४४0.३६
एकूण ३७६ १0११0.६३
१0 टक्के भांडवली अनुदान अर्थसाहाय्य
विभाग प्रस्ताव मंजूर अर्थसाहाय्य (रु. लाखांत)
विदर्भ १८ २00१.१८
मराठवाडा ३६ ४८४.६0
उत्तर महाराष्ट्र ८१ १८४७.७0
एकूण १६५ ४३३३.४८
*हिंगणघाट व अकोल्याचा प्रकल्प प्रेरणादायी
हिंगणघाट व वणी रंभापूर (अकोला) या दोन प्रकल्पांचे काम प्रगतीपथावर असून, हिंगणघाट प्रकल्पात कापूस ते कापडापर्यंत प्रक्रिया केली जाणार आहे. अत्यंत आधुनिक तंत्रज्ञान वापरू न उभारण्यात आलेले हे प्रकल्प या भागात उद्योगांना चालना देणारे ठरणार आहेत. परदेशात उभारतात त्या पद्धतीने या प्रकल्पांची उभारणी झाली आहे. येत्या एक-दोन वर्षात या प्रकल्पात कापूस गेल्यानंतर थेट कापड बाहेर येणार आहे.
* बाळापुरात जागेची पाहणी
टेक्सटाइल पार्कसाठी लागणारे पाणी, वीज व जागा उपलब्ध असल्याने वस्त्रोद्योग संचालनालयाच्या संचालक रिचा बागला यांनी बाळापूरच्या जागेची शुक्रवारी पाहणी केली.