महाराष्ट्र दिनी फडकवणार विदर्भाचा झेंडा
By Admin | Published: April 19, 2016 04:16 AM2016-04-19T04:16:16+5:302016-04-19T04:16:16+5:30
वेगळ्या विदर्भ राज्याच्या मागणीची हाक संपूर्ण देशात जावी, यासाठी १ मे रोजी विदर्भवादी संघटनांतर्फे सर्व ११ जिल्ह्यांतील मुख्यालयी विदर्भाचा झेंडा फडकविण्यात येणार
योगेश पांडे, नागपूर
वेगळ्या विदर्भ राज्याच्या मागणीची हाक संपूर्ण देशात जावी, यासाठी १ मे रोजी विदर्भवादी संघटनांतर्फे सर्व ११ जिल्ह्यांतील मुख्यालयी विदर्भाचा झेंडा फडकविण्यात येणार असून महाराष्ट्र दिनी संपूर्ण विदर्भात काळा दिवस पाळण्यात येणार आहे. राज्याचे माजी महाधिवक्ता व विदर्भवादी नेते अॅड. श्रीहरी अणे हे स्वत: नागपूरात विदर्भाचा झेंडा फडकविणार आहेत.
१ मे १९६० रोजी विदर्भ महाराष्ट्रात समाविष्ट करण्यात आला अन् त्यानंतर शासनाने नागपूर कराराचे पालनच केलेले नाही. विदर्भाकडे कायम दुर्लक्ष करण्यात आले.
वेगळ्या विदर्भाची भूमिका घराघरामध्ये जावी व नागरिकांचे जास्तीतजास्त समर्थन मिळावे
यासाठी विदर्भवादी संघटनांकडून
१ मे रोजी काळा दिवस पाळण्यात येणार आहे, अशी माहिती अशी माहिती ‘विदर्भ कनेक्ट’चे अध्यक्ष अॅड. मुकेश समर्थ यांनी दिली. राज्याचे राजकारण आणखी तापण्याची चिन्हे आहेत.