विदर्भ गारठला, पुण्यात गारवा कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2017 06:38 AM2017-12-21T06:38:12+5:302017-12-21T06:38:31+5:30
राज्यात थंडीचा कडाका वाढल्यानंतर ढगाळ हवामानामुळे पुन्हा तापमानात वाढ झाली होती. उत्तरेकडून शीत वारे येऊ लागल्याने प्रमुख शहरांच्या तापमानात किंचित वाढ झाली असली तरी गारठा मात्र कायम आहे. विदर्भातील बहुतांश ठिकाणी तापमानाचा पारा घसरला होता. तर, पुण्यात ११.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
पुणे : राज्यात थंडीचा कडाका वाढल्यानंतर ढगाळ हवामानामुळे पुन्हा तापमानात वाढ झाली होती. उत्तरेकडून शीत वारे येऊ लागल्याने प्रमुख शहरांच्या तापमानात किंचित वाढ झाली असली तरी गारठा मात्र कायम आहे. विदर्भातील बहुतांश ठिकाणी तापमानाचा पारा घसरला होता. तर, पुण्यात ११.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये कडाक्याची थंडी आहे. उत्तरेकडील हे थंड प्रवाह राज्याकडे येऊ लागल्याने राज्याच्या तापमानात मंगळवारी मोठी घट झाली होती. विदर्भातील गोंदिया येथे तापमान ८ अंशापर्यंत खाली आले होते. तर पुण्यात ११.७ अंशावर आले होते. बुधवारी तापमानात वाढ होत गोंदिया येथे राज्यातील नीचांकी ८.६ अंश तापमान नोंदविण्यात आले. उपराजधानी नागपुरातही ९.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्यातील इतरही भागात्ां तापमान सातत्याने कमी-अधिक होत आहे.
राज्याच्या विविध भागांतील किमान तापमान अंश सेल्सिअसमध्ये : पुणे ११.६, नगर ११.४, जळगाव १२.६, कोल्हापूर १५.३, महाबळेश्वर १३.६, नाशिक १३.६, सांगली १४.२, सातारा १२.२, सोलापूर ११.१, मुंबई २२.४, अलिबाग १८.२, रत्नागिरी १७.३, भिरा १६.५, संभाजीनगर १३.५, परभणी १२.२, नांदेड १०.०, अकोला ११.०, अमरावती १२.८, बुलडाणा १४.०, चंद्रपूर १२.६, गोंदिया ८.६, नागपूर ९.२, वर्धा १०.४, यवतमाळ ११.४.