विदर्भात गारपीट?
By Admin | Published: January 18, 2016 03:50 AM2016-01-18T03:50:40+5:302016-01-18T03:50:40+5:30
बंगालच्या उपसागरावरून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे राज्यात पावसाचे वातावरण तयार होत आहे. शनिवारी विदर्भातील काही शहरांमध्ये हलका पाऊस झाला.
पुणे : बंगालच्या उपसागरावरून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे राज्यात पावसाचे वातावरण तयार होत आहे. शनिवारी विदर्भातील काही शहरांमध्ये हलका पाऊस झाला. सोमवारी विदर्भात व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहेस, तर विदर्भात गारपीटीसह पाऊस पडण्याचा इशारा हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. या बदलत्या हवामानामुळे राज्यात तापमानात वाढ दिसत आहे. रविवारी पुण्यात सर्वात कमी तापमान १०. ३ अंश नोंदविले.
अकोला, बुलडाणा, अमरावती जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. राज्यात दिवसभर अधूनमधून ढगाळ वातावरण तयार झाल्याने किमान तापमानात वाढ झाली. मध्य भारत आणि दक्षिण भारताच्या उत्तरेकडील भागात बंगालच्या उपसागरावरून येणाऱ्या उष्ण आणि उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा संगम होत आहे. यामुळे पावसाचे चित्र तयार झाले आहे. मध्य महाराष्ट्रात किंचित प्रमाणात वाढ झाल्याचे नोंदविण्यात आले. (प्रतिनिधी)
तापमान (अंश सेल्सियसमध्ये)
जळगाव १३, महाबळेश्वर ११.२, मालेगाव १६.६, नाशिक १२.४, सांगली १५.६, सातारा १०.९, सोलापूर १८.२, औरंगाबाद १७, परभणी १८.२, नांदेड १४.५, अकोला १९.५, अमरावती १६, बुलडाणा १६.५, ब्रह्मपुरी १६.७, चंद्रपूर १८.२, गोंदिया १४.८, नागपूर १६.९, वाशिम १९.८, वर्धा १७.६, यवतमाळ १८.