विदर्भ, मराठवाड्यात धवलक्रांती
By admin | Published: August 27, 2016 04:48 AM2016-08-27T04:48:06+5:302016-08-27T04:48:06+5:30
८ जिल्ह्यांमधील २ हजार गावांमध्ये दुग्ध विकासाचा धडक कार्यक्रम राबविणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे जाहीर केले.
मुंबई : विदर्भ व मराठवाड्यात दुग्धव्यवसाय विकासाला चालना देण्यासाठी राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळामार्फत ८ जिल्ह्यांमधील २ हजार गावांमध्ये दुग्ध विकासाचा धडक कार्यक्रम राबविणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे जाहीर केले.
मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी या संदर्भात आढावा बैठक झाली. यावेळी पशुसंवर्धन व दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर, प्रधान सचिव विजय कुमार, राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाचे चेअरमन दिलीप रथ, दुग्ध व्यवसाय विकास विभागाचे आयुक्त आर.जी.कुलकर्णी आदी उपस्थित होते. विदर्भातील ५ जिल्हे व मराठवाड्यातील ३ जिल्हे अशा एकूण ८ जिल्ह्यांत या उपक्र मातून ६० हजार कुटुंबांना नियमित उत्पन्नाद्वारे उपजिविकेचे साधन उपलब्ध होणार आहे. ग्रामीण भागातील सुमारे ३ हजार युवकांना प्रत्यक्ष रोजगारांच्या संधी उपलब्ध होणार असून वाहतूकदार, वितरक, किरकोळ विक्र ेते व अन्य सुविधा पुरविणारे यांना अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
प्रकल्प अंमलबजावणीच्या ३ वर्षांच्या कालावधीत सुमारे २ लाख कि.ग्रॅ. प्रतिदिवस एवढे दुध उत्पादन अपेक्षित आहे. त्याद्वारे २०० कोटी रु पये एवढी रक्कम दूध उत्पादकांना मिळणार आहे. विदर्भ व मराठवाडा या विभागातील दुधाळ जनावरांच्या उत्पादकतेत लक्षणीय सुधारणा होणार आहे. राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळ, नागपूर येथे नव्याने १०० दूध विक्री केंद्रे स्थापन करणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.२ हजार गावांव्यतिरिक्त राज्य शासन इतर गावांत स्वतंत्र दुग्ध व्यवसाय विकास कार्यक्र म राबविणार असल्याचेही त्यांनी सांगितले. (विशेष प्रतिनिधी)