विदर्भ, मराठवाडा तापलेलाच; उष्माघाताचे आणखी तीन बळी
By admin | Published: May 24, 2016 03:08 AM2016-05-24T03:08:40+5:302016-05-24T03:08:40+5:30
विदर्भ, मराठवाड्यात उष्णतेची लाट कायम असून सोमवारी उष्माघाताने तिघांचा मृत्यू झाला. बुधवारपासून सलग तीन दिवस मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडेल
Next
पुणे/मुंबई : विदर्भ, मराठवाड्यात उष्णतेची लाट कायम असून सोमवारी उष्माघाताने तिघांचा मृत्यू झाला. बुधवारपासून सलग तीन दिवस मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे.
राज्यात सर्वाधिक ४५ अंश सेल्सिअस तापमान नागपूरमध्ये नोंदले गेले. ब्रह्मपुरीत ४४.५
आणि वर्ध्यात ४४ अंश सेल्सअस तापमानाची नोंद झाली.