विदर्भात सामान्यपेक्षा सहा टक्के कमी पाऊस

By admin | Published: June 23, 2017 10:47 PM2017-06-23T22:47:29+5:302017-06-23T22:47:29+5:30

विदर्भात १ ते २३ जूनपर्यंत पडणा-या एकूण पावसापैकी सामान्यपेक्षा सहा टक्के कमी पाऊस झाला आहे. याची तीव्रता नागपूर जिल्ह्यात अधिक असून

Vidarbha six percent less rainfall than normal | विदर्भात सामान्यपेक्षा सहा टक्के कमी पाऊस

विदर्भात सामान्यपेक्षा सहा टक्के कमी पाऊस

Next
>राजरत्न सिरसाट/ऑनलाइन लोकमत
अकोला, दि. 23 - विदर्भात १ ते २३ जूनपर्यंत पडणाºया एकूण पावसापैकी सामान्यपेक्षा सहा टक्के कमी पाऊस झाला आहे. याची तीव्रता नागपूर जिल्ह्यात अधिक असून, येथे सामान्यपेक्षा ५५ टक्के कमी पाऊस आहे. बुलडाणा आणि वाशिम जिल्ह्यात सामान्यपेक्षा जास्त पाऊस झाल्याची नोंद नागपूरच्या हवामानशास्त्र विभागाने केली आहे. 
 
विदर्भात १६ जून रोजी मान्सूनच्या पावसाने प्रवेश केला आहे; परंतु अचानक दडी मारल्याने जून महिन्यात पडणाºया पावसाची सरासरी घसरली आहे. मृग नक्षत्राच्या सुरुवातीला पावसाळी वातावरण तयार झाले होते, तसेच त्याअगोदर मान्सूनपूर्व पाऊस अधून-मधून सुरू च होता. राज्यात मान्सून दाखल झाल्यानंतर भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या भाकिताप्रमाणे चांगला पाऊस येईल, अशी अपेक्षा होती; परंतु मान्सून आगमनाच्या सुरुवातीलाच पाऊस अचानक गायब झाला आहे.
 
दरम्यान, १ जूून ते २३ जूनपर्यंत विदर्भातील नागपूर जिल्ह्यात सामान्यपेक्षा कमी पाऊस झाला असून, भंडारा जिल्ह्यातही हेच चित्र आहे. येथेही सामान्यपेक्षा ५० टक्के पाऊस कमी आहे. गडचिरोली जिल्ह्यात ३७ टक्के कमी पाऊस असून, गोंदिया जिल्ह्यात सामान्यपेक्षा ३६ टक्के पाऊस कमी आहे. चंद्रपूर जिल्ह्यात सामान्यपेक्षा १० टक्के कमी पाऊस झाला आहे. अमरावती जिल्ह्यात १५ टक्के कमी पाऊस आहे. विशेष म्हणजे, हे सर्व जिल्हे पावसाचे आहेत. वाशिम जिल्ह्यात मात्र सामान्यपेक्षा ६६ टक्के पाऊस अधिक झाला असून, बुलडाणा जिल्ह्यात अधिक पावसाचे प्रमाण हे ५२ टक्के आहे. यवतमाळ जिल्ह्यात २५ टक्के जास्त, अकोला जिल्ह्यात सहा टक्के, तर वर्धा जिल्ह्यात सामान्यपेक्षा चार टक्के पाऊस अधिक झाला आहे.
 
विदर्भात शुक्रवारी काही ठिकाणी पाऊस झाला आहे. अकोला जिल्ह्यातील काही भागात पाऊस पडला. मागील चोवीस तासांत अकोला येथे ६.० मि.मी., ब्रम्हपुरी २.४ मि.मी., चंद्रपूर ५.० मि.मी., गोंदिया १५.१ मि.मी., वर्धा ११.८ मि.मी., तर यवतमाळ येथे ६.६ मि.मी. पावसाची नोंद नागपूर हवामानशास्त्र विभागाने केली आहे.

Web Title: Vidarbha six percent less rainfall than normal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.