विदर्भात अद्याप ६ टक्के पाऊस कमीच!
By Admin | Published: September 5, 2014 01:29 AM2014-09-05T01:29:16+5:302014-09-05T01:46:11+5:30
वाशिम, बुलडाणा, यवतमाळ जिल्हा तहानलेलाच
अकोला : विदर्भात ६ टक्के पावसाची तूट कायम असून, बुलडाणा, वाशिम व यवतमाळ या जिल्हयात अद्याप ३0 टक्के पाऊस कमी आहे. त्यामुळे भविष्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची मोठी शक्यता आहे.
यावर्षी दीड महिना उशिरा पावसाला सुरुवात झाली. १५ व २३ जुलै रोजी पावसाने हजेरी लावली; त्यानंतर २९ ते ३१ ऑगस्टपर्यंत तुरळक पाऊस झाला . पण या पावसाने विदर्भातील एकूण सरासरी गाठली नसून, सरासरी ५ टक्के पावसाची तूट कायम आहे. सर्वाधिक पावसाची झळ पूर्व विदर्भा तील वाशिम, बुलडाणा, यवतमाळ जिलला बसली असून, बुलडाणा जिल्हयात ही तूट ३६ टक्के असून, वाशिम २५ टक्के, यवतमाळ जिल्हयात २५ टक्के, अमरावती व अकोला जिल्हयात पावसाची ५ टक्के तूट आहे.
४ सप्टेंबर सकाळी ८.३0 वाजेपर्यंत विदर्भात एकूण ५६४.८ मि.मी. पावसाची नोंद नागपूर येथील हवामानशास्त्र विभागाने केली आहे. तथापि नार्मल ५९७.९ मि.मी. पाऊस हवा होता. त्यामुळे संपूर्ण विदर्भात ६ टक्के पाऊस कमी आहे.
दरम्यान, संपलेल्या २४ तासांत ४ सप्टेंबर सकाळी ८.३0 वाजेपर्यंंत विदर्भातील चिखलदरा येथे २ सेमी., धानोरा, मलकापूर, संग्रामपूर, सडक अर्जुनी व कुरखेडा या ठिकाणी प्रत्येकी १ से.मी. पावसाची नोंद झाली आहे.
* पावसाचा इशारा
कोकण-गोव्यात बर्याच ठिकाणी; मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यात पुणे हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.
* पश्चिम विदर्भातील धरणाचा जलसाठा
पुरेपूर पाऊस नसल्याने पश्चिम विदर्भातील अकोला, वाशिम येथील धरणांच्या जलपातळीत अल्प वाढ झाली आहे. अकोला शहराला पाणीपुरवठा करणार्या काटेपुर्णा धरणात केवळ २७ टक्के जलसाठा आहे. मोर्णा या धरणात ४२.४७ टक्के,निगरुणा ७८.७२ टक्के तर उमा या धरणात केवळ १७.३९ टक्के जलसाठा शिल्लक आहे. बुलडाणा जिल्ह्यातील नळगंगा धरणात ४0.७५ टक्के, ज्ञानगंगा ५४.३५ टक्के, मस ९0.९६, कोराडी ८४.३९ टक्के तर पलढग या धरणात ६५.२५ टक्के जलसाठा शिल्लक आहे. यवतमाळ जिल्हय़ातील पूस या मोठय़ा धरणात ६८.0१ टक्के, लोअरपूस ८७.७२ टक्के, गोकी धरणात ८0.७८ टक्के तर सायखेडा, वाघाडी व बोरगाव धरणे शंभर टक्के भरले आहे.