विदर्भ दुष्काळमुक्त होणार, उत्तर महाराष्ट्रालाही दिलासा मिळणार; फडणवीसांनी कोणत्या योजनेची घोषणा केली?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2025 23:22 IST2025-03-07T23:21:54+5:302025-03-07T23:22:14+5:30

प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर विदर्भात दुष्काळ दिसणार नाही.  तसेच यामुळे पाण्यावरून होणारे प्रादेशिक वाद उद्भवणार नाहीत, असं मुख्यमंत्री म्हणाले.

Vidarbha will be drought free North Maharashtra will also get relief What scheme did devendra Fadnavis announce | विदर्भ दुष्काळमुक्त होणार, उत्तर महाराष्ट्रालाही दिलासा मिळणार; फडणवीसांनी कोणत्या योजनेची घोषणा केली?

विदर्भ दुष्काळमुक्त होणार, उत्तर महाराष्ट्रालाही दिलासा मिळणार; फडणवीसांनी कोणत्या योजनेची घोषणा केली?

CM Devendra Fadnavis: "महाराष्ट्र देशात सर्वच क्षेत्रांमध्ये आघाडीवर असलेले राज्य आहे. उद्योग व्यवसायापासून ते शेती, सेवा क्षेत्र व आरोग्य सुविधा यामध्ये राज्य अग्रेसर आहे. पायाभूत सुविधांचा विकास देशात सर्वाधिक महाराष्ट्रमध्येच आहे. कुठल्याही क्षेत्रात ‘सेकंड टू नन’ नसलेल्या महाराष्ट्राला अधिकाधिक उत्तम राज्य बनवू. विरोधकांनी राज्यकारभारासाठी आपल्याकडील चांगल्या सूचना द्याव्यात," अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत राज्यपाल यांच्या अभिभाषणावरील चर्चेच्या उत्तरादरम्यान व्यक्त केली.
 
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, "महाराष्ट्रातील महत्त्वाकांक्षी नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्पाला राज्यपालांची मंजुरी मिळाली असून यामुळे नाशिक आणि जळगाव जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना सिंचनाचा मोठा लाभ होणार आहे. हा प्रकल्प राज्यातील दुसरा मोठा नदीजोड प्रकल्प असून, यामुळे ४९,५१६ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. विशेषतः कळवण, देवळा आणि मालेगावसह जळगाव जिल्ह्यातील अनेक भागांना याचा फायदा होईल. तसेच वैनगंगा ते नळगंगा नदीजोड प्रकल्पांतर्गत ३१ नवीन धरणांचे बांधकाम करण्यात येणार आहे. तसेच 426 किलोमीटरचा कालवा निर्माण करण्यात येणार आहे. या नदीजोड प्रकल्पामुळे विदर्भाचे चित्र बदलणार असून प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर विदर्भात दुष्काळ दिसणार नाही.  तसेच यामुळे पाण्यावरून होणारे प्रादेशिक वाद उद्भवणार नाहीत." 

दरम्यान, "नदीजोड प्रकल्पांमुळे  पाणीटंचाई असलेल्या भागांना मोठा दिलासा मिळेल. या प्रकल्पांसाठी लवकरच निविदा प्रक्रिया राबवली जाणार असून, शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देण्याकरिता शासन कटिबद्ध आहे. हा प्रकल्प म्हणजे राज्यातील जलसंपत्तीचे प्रभावी व्यवस्थापन करण्याच्या दिशेने मोठे पाऊल आहे. राज्यातील सिंचन व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी अशा महत्त्वपूर्ण प्रकल्पांना गती दिली जाणार आहे," असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.

Web Title: Vidarbha will be drought free North Maharashtra will also get relief What scheme did devendra Fadnavis announce

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.