गडकरींच्या वाड्यावर विदर्भवाद्यांचे ढोल बजाओ आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 09:09 PM2017-07-19T21:09:21+5:302017-07-19T21:09:29+5:30
स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे येत्या ९ आॅगस्ट रोजी केंद्रीय भुपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी
ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 19 : स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे येत्या ९ आॅगस्ट रोजी केंद्रीय भुपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांच्या महाल येथील वाड्यासमोर ढोल बजाओ आंदोलन करण्यात येणार आहे.
विदर्भ राज्य आंदोलन समितीची बैठक मनेवाडा येथे पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. नितीन गडकरी यांनी लोकसभा निवडणुकीत भाजपा सत्तेवर आल्यास स्वतंत्र विदर्भ राज्य करण्याचे आश्वासन दिले होते. भाजपचे सरकार
येऊन तीन वर्षे झाली. परंतु विदर्भाचे प्रतिनिधी म्हणून त्यांनी यासंदर्भात केंद्र सरकारकडे कुठलेही साकडे घातले नाही. त्यामुळे गडकरी यांच्यासह विदर्भाच्या दहाही खासदारांच्या घरासमोर ढोल बजाओ आंदोलन करण्यात येणार आहे. ९ आॅगस्टला विदर्भ चंडीकेची महापूजा करून गडकरी वाड्यावर मोर्चा काढण्यात येईल. त्यानंतर ढोल वाजवून नितीन गडकरी यांच्या राजीनम्याची मागणी करण्यात येईल. या बैठकीत विदर्भ राज्य आंदोलन समितीचे मुख्य संयोजक राम नेवले, राजू नागुलवार, प्रभाकर कोंडबत्तुनवार, महेंद्र भांगे, महादेव नगराळे, डॉ. पुरुषोत्तम भोंडे, रमेश गिरडकर, विलास मालके, पुररुषेत्तम शेंदरे आदी
उपस्थित होते.