विदर्भाचा शिलकी अर्थसंकल्प
By admin | Published: October 4, 2016 04:48 AM2016-10-04T04:48:28+5:302016-10-04T04:48:28+5:30
विदर्भाच्या प्रतिरूप विधानसभेत सोमवारी विदर्भाचा शिलकी अर्थसंकल्प सादर करण्यात आला. प्रतिरूप विधानसभेतील विदर्भ राज्याचे वित्त
नागपूर : विदर्भाच्या प्रतिरूप विधानसभेत सोमवारी विदर्भाचा शिलकी अर्थसंकल्प सादर करण्यात आला. प्रतिरूप विधानसभेतील विदर्भ राज्याचे वित्त व नियोजनमंत्री डॉ. श्रीनिवास खांदेवाले यांनी सन २०१७-१८चा ५४ हजार ४० कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला.
विदर्भ राज्य आंदोलन समितीच्यावतीने देशपांडे सभागृहात आयोजित दोन दिवसीय ‘विदर्भाच्या प्रतिरूप विधानसभे’ला सोमवारपासून सुरुवात झाली. विधानसभेच्या पहिल्याच दिवशी मांडण्यात आलेल्या या अर्थसंकल्पात वीजशुल्क दर हे २० टक्क््यांनी कमी करण्यात आले असून नवीन आर्थिक वर्षात कवाढ करण्यात आलेली नाही किंवा नवीन करही लावलेला नाही. तसेच वर्षभरात खर्च वजा होता तब्बल १६६० कोटी रुपये शिल्लक राहणार आहे. हे या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य ठरले. या अर्थसंकल्पावरून भविष्यात विदर्भ हे स्वतंत्र राज्य झालेच तर ते कसे सक्षम राहील, याचे संकेत देण्यात आले. डॉ. श्रीनिवास खांदेवाले यांनी अर्थसंकल्प सादर करताना विदर्भातील एकूण परिस्थितीही विशद केली. (प्रतिनिधी)