विदर्भाच्या सुपुत्राने सभात्याग केला तर नातवाने न्याय दिला, प्रणिती शिंदेचा फडणवीसांना टोला 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2019 09:56 PM2019-12-21T21:56:08+5:302019-12-21T21:56:59+5:30

मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण कर्जमाफी आणि सात बारा कोरा करण्याचा शब्द फिरवल्याचा आरोप करत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सभात्याग केला होता.

Vidarbha's son walk out but grandson gives justice - Praniti Shinde | विदर्भाच्या सुपुत्राने सभात्याग केला तर नातवाने न्याय दिला, प्रणिती शिंदेचा फडणवीसांना टोला 

विदर्भाच्या सुपुत्राने सभात्याग केला तर नातवाने न्याय दिला, प्रणिती शिंदेचा फडणवीसांना टोला 

Next

नागपूर -  विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीची घोषणा करत राज्यातील शेतकरी वर्गाला दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण कर्जमाफी आणि सात बारा कोरा करण्याचा शब्द फिरवल्याचा आरोप करत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सभात्याग केला होता. या सभात्यागावरून काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे. अधिवेशनात विदर्भाच्या सुपुत्राने सभात्याग केला तर नातवाने न्याय मिळवून दिला, असे वक्तव्य प्रणिती शिंदे यांनी केले आहे. 

विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी समारोपाचे भाषण करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपली आजी ही विदर्भातील असल्याचे सांगत आपले विदर्भाशी धट्ट नाते असल्याचे सांगितले होते. तोच धागा पकडून प्रणिती शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला. शेतकरी कर्जमाफीची घोषणा झाल्यावर विदर्भाच्या सुपुत्राने सभात्याग केला. तर नातवाने न्याय मिळवून दिला, असे प्रणिती शिंदे म्हणाल्या.  

''नैसर्गिक आपत्तींमुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील शेतकऱ्यांचे ३० सप्टेंबर २०१९ पर्यंतचे थकीत कर्ज माफ करण्याची घोषणा आम्ही करत आहोत. शेतकऱ्यांचे २ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्यात येईल. कर्जमाफीच्या प्रकियेची सुरुवात ही मार्च महिन्यांपासून होईल. तसेच कर्जमाफीचे पैसे हे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा केले जातील. तसेच नियमित कर्ज भरणाऱ्यांसाठी येत्या १५ दिवसांत योजना जाहीर केली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सभागृहात केली होती. 

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कर्जमाफीची घोषणा केल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण कर्जमाफीवरून सरकारला धारेवर धरले. सरकटक कर्जमाफी आणि सातबारा कोरा करण्याच्या घोषणेचे काय झाले असा सवाल करत देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहातून सभात्याग केला होता.   
 

Web Title: Vidarbha's son walk out but grandson gives justice - Praniti Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.