VIDEO - नाशिकच्या ब्रेन डेड तरुणामुळे 13 जणांना मिळणार नवीन जीवन

By Admin | Published: July 6, 2017 08:58 AM2017-07-06T08:58:04+5:302017-07-06T12:22:14+5:30

ऑनलाइन लोकमत नाशिक, दि. 6 -  नाशिकहून ब्रेन डेड रुग्णाचे हृदय एअर ग्रीन कॉरिडोरनं पुणे येथे नेण्यात येणार आहे. ...

VIDEO - 13 people get new life in Nashik's brain dead | VIDEO - नाशिकच्या ब्रेन डेड तरुणामुळे 13 जणांना मिळणार नवीन जीवन

VIDEO - नाशिकच्या ब्रेन डेड तरुणामुळे 13 जणांना मिळणार नवीन जीवन

googlenewsNext
ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. 6 -  नाशिकहून ब्रेन डेड रुग्णाचे हृदय एअर ग्रीन कॉरिडोरनं पुणे येथे नेण्यात येणार आहे. नाशिक जिल्ह्यातील हे पहिलंच एअर ग्रीन कॉरिडोर असणार आहे. नाशिकमध्ये अश्विन झळके ( वय 40 वर्ष) या युवकाचा मंगळवारी (4 जुलै) बाईकवरुन  घसरून अपघात झाला होता. या अपघातात झळके यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.  त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते मात्र 12 तासांनी डॉक्टरांनी त्यांना ब्रेन डेड घोषित केले.  
 
यावेळी झळके यांच्या कुटुंबीयांना अवयव दानाची संकल्पना समजावून सांगितली. त्यांच्या नातेवाईकांनीही  अवयव दान करण्यासाठी तयारी दर्शवली. यानंतर तातडीनं सर्व यंत्रणा कार्यान्वित झाली. हृदयापासून ते त्वचेपर्यंत झळके यांचे अवयव दान करण्यात आले आले आहेत. यामुळे एकूण 13 रुग्णांना नवीन आयुष्य मिळणार आहे. झळके यांचे कुटुंब जेलरोड परिसरात वास्तव्यास आहे. झळके यांच्या पत्नीनं या दुःखद घटनेतही धीर धरत स्वतःला सावरले आहे. 
(ग्रीन कॉरिडोरमुळे 19 मिनिटांत पोहोचलं ह्रदय)
समाजाचं भलं व्हावं, या उदात्त हेतूनं झळके यांच्या पत्नीनं कुटुंबीयांना आधार देत अवयव दानाचे महत्त्व पटवून दिले व अवयव दान करण्याचा तात्काळ निर्णय घेतला.त्यांच्या सामाजिक भानाचे कौतुक डॉक्टरांनीदेखील केले. झळके यांच्या पश्चात दोन लहान मुले, भाऊ, बहिणी असा परिवार आहे. अश्विन झळके यांचे हृदय एअर ग्रीन कॉरिडोरद्वारे 9.30 वाजण्याच्या सुमारास पुण्याकडे रवाना होणार आहे. यानतर महामार्गाद्वारे ग्रीन कॉरिडोर आखला जाऊन पुण्यापर्यंत रुग्णवाहिका यकृत, मूत्रपिंड नेले जाणार आहे. यासाठी नाशिक वाहतूक पोलीस सज्ज आहेत. 
 
(मेडिकलच्या विद्यार्थ्यानं मृत्यूनंतर 4 जणांना दिलं जीवनदान)
 
दरम्यान, काही दिवसांपूर्वी इंदुरमधील ब्रेन डेड तरुणाच्या अवयव दानामुळे 4 जणांना जीवनदान मिळाले आहे. रस्ते अपघातात गंभीर स्वरुपात जखमी झालेल्या 20 वर्षीय मेडिकल विद्यार्थ्याचं उपचारादरम्यान ब्रेन डेड झाल्यानं त्याचा मृत्यू झाला. प्रियांक गुप्ता असे या मृत पावलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. प्रियांकनं या जगाचा कायमचा निरोप जरी घेतला असला तरीही जाण्यापूर्वी तो चार जणांना जीवनदान देऊन गेला आहे.   
 
 
अवयव दान करण्यासाठी प्रोत्साहन देणारी स्वयंसेवी संस्था "मुस्कान"चे कार्यकर्ते संदीपन आर्य यांनी सांगितले की, 26 जूनच्या रात्री झालेल्या भीषण रस्ते अपघातात गंभीर जखमी झालेल्या प्रियांक गुप्ताला एका खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून हॉस्पिटलमधील डॉक्टर त्याची सर्व प्रकारे योग्य ती काळजी घेत होते. मात्र अखेर 3 जुलैला प्रियांकला ब्रेन डेड घोषित करण्यात आले. 
 
संदीपन आर्य यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रियांक मूळचा मध्य प्रदेशातील दमोह येथील रहिवासी होता. इंदुरमधील एका खासगी मेडिकल कॉलेजमध्ये तो एमबीबीएसच्या प्रथम वर्षात शिक्षण घेत होता. पण रस्ते अपघातात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर प्रियांकच्या कुटुंबीयांना अवयव दानाची माहिती देण्यात आली. दुःखाचा डोंगर कोसळलेला असतानाही कुटुंबीयांनी प्रियांकचे अवयव दान करण्यासाठी तयारी दर्शवली.
 
आर्य यांनी सांगितले की, सोमवारी (3 जुलै) रात्री प्रियांकचे हृदय एअर अॅम्ब्युलन्सनं दिल्लीतील एका खासगी हॉस्पिटलमध्ये एका रुग्णाच्या शरीरात प्रत्यारोपण करण्यात आले तर इंदुरमधील वेगवेगळ्या हॉस्पिटलमधील तीन रुग्णांच्या शरीरात त्याचे यकृत आणि दोन्ही किडनी यांचे प्रत्यारोपण करण्यात आले.  प्रियांकचे दोन्ही डोळे आणि त्वचा वेगवेगळ्या संस्थांना देण्यात आले असून याद्वारे आणखी दोन जणांना नवीन आयुष्य मिळू शकणार आहे. 
 
आर्य यांनी दिलेल्या माहितीनुसार, इंदुरमध्ये गेल्या 20 महिन्यात ब्रेन डेड झालेल्या 21 जणांचे अवयव दान करण्यात आले आहेत. यात हृदय, यकृत, किडनी, डोळे आणि त्वचा यांच्या प्रत्यारोपणानं इंदुरसहीत दिल्ली, हरियाणा आणि मुंबईतील जवळपास 120 रुग्णांना नवं आयुष्य मिळालं आहे. 
 
https://www.dailymotion.com/video/x84574r

Web Title: VIDEO - 13 people get new life in Nashik's brain dead

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.