VIDEO : अनुकरणातून १५ वर्षिय रवी ने जगविले १० लिंबुची झाडे!
By Admin | Published: January 8, 2017 08:39 AM2017-01-08T08:39:16+5:302017-01-08T11:29:49+5:30
ऑनलाइन लोकमत / नंदकिशोर नारे वाशिम,दि. 8 -शिरपूर येथील एका पंधरा वर्षिय रवी नामक मुलाने अनुकरणातून शेतातील धुऱ्यावरील लिंबुची ...
ऑनलाइन लोकमत / नंदकिशोर नारे
वाशिम,दि. 8 -शिरपूर येथील एका पंधरा वर्षिय रवी नामक मुलाने अनुकरणातून शेतातील धुऱ्यावरील लिंबुची झाडे जगविण्याचा उपक्रम राबवून परिसरात कौतुकास पात्र ठरला आहे.
वाशिम जिल्हयातील जैनाची काशी म्हणून प्रसिध्द असलेले गाव शेतीमध्ये नवनविन प्रयोग करण्यात सर्वात पुढे आहे. येथील शेतकऱ्यांप्रमाणेच त्यांची मुले सुध्दा नवनविन प्रयोग करीत असल्याचे दिसून आले. शिरपूर जैन येथे विठ्ठल पिराजी तिरके या शेतकऱ्याचे कुटुंब वास्तव्यास आहे. शेतीत नवनविन प्रयोग करुन त्यांनी त्यांच्याकडे असलेली १० एकर शेती १५ एकर केली. शेताच्या धुऱ्याच्या बाजुला रवीच्या वडिलांनी १० लिंबुची झाडे लावलीत. एकेदिवशी गावातीलच एका घरात त्याने लिंबुच्या एका झाडाला सलाईनव्दारे पाणी देण्याचा प्रयोग पाहिला. त्याने कुणाशी काही न बोलता घरी आला. वडिलांकडून काही पैसे घेतले व गावातीलचं दवाखान्यांमध्ये जावून वापर केलेल्या सलाईनच्या खाली बॉटल्स जमा केल्यात. त्याला त्या बॉटल्स मोफतचं मिळाल्यात. त्याने त्या कापून व्यवस्थित एका झाडाखाली एक बॉटल्स लावून ठिंबक पध्दतीने झाडांना पाणी देणे सुरु केले. दररोज शाळेत जाण्याआधी व परत येतांना रवी आठवणीने सलाईनच्या बॉटल्स भरुन ठेवतो. त्या बॉटलमधील पाणी जवळपास तीन तास पूरत असल्याने दोन वेळा त्या बॉटल भरल्या जात आहेत. सहा तास थेंब थेंब पाणी लिंबाच्या झाडाला मिळत आहे. यामुळे झाडाजवळ ओलावा निर्माण राहत असल्याने झाडाची वाढ होत आहे. याबाबत त्याच्या वडिलाना विचारले असता मुलाने केलेला प्रयोग पाहून कौतूक वाटले. त्याने केलेला प्रयोग झाडांसाठी उपयुक्त असल्याचे त्यांनी सांगितले. एवढया कमी वयात त्याला ही बाब कळल्याचा आनंदही झाला.
https://www.dailymotion.com/video/x844nke