VIDEO : ३० लाख पणत्या बनविणारे हात थांबले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2016 12:21 PM2016-10-27T12:21:23+5:302016-10-27T12:21:23+5:30

दिवाळीत सर्वात महत्वाच्या असणा-या मातीच्या पणत्यांऐवजी आता आकर्षित, रेखीव दिसणाºया ‘टेराकोटा’च्या पणत्यांना जास्त मागणी आहे.

VIDEO: 3 million handicap hand stops! | VIDEO : ३० लाख पणत्या बनविणारे हात थांबले!

VIDEO : ३० लाख पणत्या बनविणारे हात थांबले!

googlenewsNext
नंदकिशोर नारे, ऑनलाइन लोकमत
वाशिम, दि. २७ -   हिंदू संस्कृतीत सर्वात महत्वाचा समजला जाणारा सण दिव्यांचा सण म्हणजे  दिपावली. या सणात मातीच्या पणत्यांच्या महत्वाचे स्थान असून कलात्मक बदलामुळे मात्र ते महत्व बाजारात विक्रीस आलेल्या ‘टेराकोटा’ पणत्यांमुळे कमी झाल्याचे दिसून येत आहे. मातीच्या पणत्यांना पाहिजे तशी मागणी नसल्याने जिल्हयात जवळपास ३० लाख पणत्याा बनविणाºया कुंभारांनी पणत्याच बनविणे बंद केले आहे. कुंभारच खुद्द आकर्षित, रेखीव दिसणा-या ‘टेराकोटा’च्या पणत्या खरेदी करुन विक्री करीत आहेत.
वाशिम शहरातील जवळपास ९५ टक्के कुंभारांनी दिवाळीसाठी लागणा-या पणत्या न बनिवता कलकत्ता येथील व्यापा-यांकडून ५०० ते ६०० रुपये हजाराने विकत घेवून त्याचीच ९०० ते १००० रुपये दराने विकून कमाई करीत आहेत. तर काही मोजके कुंभार पारंपारिक व्यवसाय टिकून ठेवण्यासाठी काही कुंंभार मात्र आधुनिकतेशी लढाई करीत आहेत. या सर्व प्रकारामुळे काही वर्षांनतर मातीच्या पणत्या नामशेष होणार असल्याचे चिन्ह आहे.  वाशिम शहरात ३० कुंभार असून दिवाळीनिमित्त पणत्या, महालक्ष्मी मुर्त्या, खेळभांडी बनवितात.  दिपावलीसाठी काही मोजके कुंभार वगळता अनेकांनी पणत्या बनविणे बंद केले आहे. बाजारात गत ४ ते ५ वर्षापूर्वी मातीच्याच पणत्या विक्रीस यायच्यात.   टेराकोटाच्या पणत्या आल्याने  २५ कुंभारांचे पणत्या बनविणारे हात थांबले आहेत. एक कुंंभार ५० हजार पणत्या बनवून विकायचा आज २५ कुंभारांचे प्रत्येकी ५० हजार पणत्या बनविणे थांबल्याने  १२ लाख ५० हजार पणत्या व ग्रामीण भागातील १६ ते १७ लाख पणत्या बनविणारे कुंभारांचे हात थांबले आहेत.  तरी काही कुंभार पारंपारिक व्यवसायाला टिकवून आधुनिकतेशी लढाई करतांना दिसून येत आहे. दिपावलीत दिवा कोणताही असो, खरे महत्व असते ते प्रज्वलित केलेल्या ज्योतीचे एवढे मात्र नक्की!
 
 

Web Title: VIDEO: 3 million handicap hand stops!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.