VIDEO : तुमच्या नावातून गणपती साकारणारा अवलिया
By Admin | Published: August 29, 2016 11:32 AM2016-08-29T11:32:33+5:302016-08-29T12:03:24+5:30
तुमच्या नावातील अक्षरात प्रत्यक्ष गणपती बप्पा द्डलाय अस म्हटल्यास वावगं ठरु नये. कारण प्रत्येकाच्याच नावातून गणेशाचे चित्र साकारताहेत अवलिया चित्रकार चंद्रकांत बडीगेर.
दीपक होमकर
ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. २९ - तुमच्या नावातील अक्षरात प्रत्यक्ष गणपती बप्पा द्डलाय अस म्हटल्यास वावगं ठरु नये...कारण प्रत्येकाच्याच नावातून अवघ्या २० ते २५ सेकंदात गणेशाचे चित्र साकारताहेत अवलिया चित्रकार चंद्रकांत बडीगेर...
मूळचे सांगली जिल्ह्य्यातील बडीगेर हे पोटापाण्याच्या शोधात मुंबईत गेले मात्र तिथून परत सांगलीत परतले अन हॉटेल मध्ये वेटर म्हणून कामाला सुरवात केली. तुटपुंजा पगारीमुळे कर्जाचा डोंगर त्यांच्या डोक्यावर आला आणि त्यानी आत्मह्त्येचाही निर्ण्य घेतला. त्यासाठी घरही सोडल व सांगली स्टॅण्डवर निराश बसलेले असताना त्याना भालचंद्र या नावात गणेशाच रुप प्रकटल्याच दिसल मग त्यानी भालचंद्रबरोबत अनेक नावातून चित्र साकारायला सुरवात केली. चित्राची प्रॅक्टीस सुरु केली ही कला जगण्याच साधन बनू शकते अस लक्षात आल्यावर त्यानी या कलेला व्यावसायात बनवल आणि अत्यंत कुशलने सबंध कलेचे व्यवासयिकरण केले. सध्या श्रावण महिन्यानिमित्त सोलापूरच्या सिध्देश्वर मंदिरात ते दर सोमवारी अशी नावे काढून देण्यासाठी येत आहेत.
चंद्रकांत हे मराठीतून गणेश साकारतात तर त्यांचा मुलगा इंग्रजी अक्षरातून तितक्याच वेगात गणेश अकाराला येतो.
केवळ दहा रुपयात नावातून गणेश साकारण्याचा त्यांचा व्यवसाय सध्या श्रावम सोमवारच्या गर्दीमुळे जोमात सुरु आहे.