Video : पोकलेन मशीन क्रेनच्या सहाय्याने बाहेर काढत असताना अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 06:45 PM2021-06-27T18:45:16+5:302021-06-27T18:46:53+5:30

पोकलेन मशीन आदळली जमिनीवर. मोठा आवाज झाल्यानं परिसरात उडाला गोंधळ

Video Accident while pulling out machine with the help of crane maharashtra beed | Video : पोकलेन मशीन क्रेनच्या सहाय्याने बाहेर काढत असताना अपघात

Video : पोकलेन मशीन क्रेनच्या सहाय्याने बाहेर काढत असताना अपघात

googlenewsNext
ठळक मुद्देपोकलेन मशीन आदळली जमिनीवर. मोठा आवाज झाल्यानं परिसरात उडाला गोंधळ.

बीड : परळी तालुक्यातील दाऊतपुर येथील राख बंधाऱ्यात रविवारी दुपारी राखेच्या ढिगाऱ्यावर अडकलेली पोकलेन मशीन क्रेनच्या सहाय्याने बाहेर काढत असताना झाला अपघात. वजन अनियंत्रित झाल्याने क्रेनसह पोकलेन मशीन उंचावरून जमीनीवर आदळली. यामुळे मोठा आवाज झाल्याने परिसरात एकच गोंधळ उडाला. या घटनेत सुदैवाने कोणासही इजा झाली नाही. क्रेन चालकाचे  दैव बलवत्तर म्हणायची वेळ आली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

दोन दिवसापूर्वीच पांगरी येथे राख वाहन चालकांना महिलेने चप्पलने चोप दिल्याचा व्हायरल झाला होता. प्रकार ताजा असताना रविवारी क्रेन व पोकलेन मशीन उंचावरून खाली आदळल्याचा व्हिडीओ वायरल झाला. हा प्रकार परळीजवळील राख बंधारा परिसरातील असल्याचे सांगण्यात येते आहे. परळी तालुक्यातील दाऊतपुर येथील राख तळ्यात दररोज २०० गाडी भरून राख घेऊन जात आहेत. 


ही राख ढिगाऱ्यातून हायवा  मध्ये टाकण्यासाठी पोकलेन मशीनचा वापर केला जातो. या परिसरात पन्नासच्यावर पोकलेन मशीन आहेत. त्यापैकी एक पोकलेन मशीन  राखेच्या ढिगावर अडकली. ही पोकलेन मशीन खाली घेण्यासाठी क्रेन मशीन आणण्यात आली आणि या क्रेनच्या सहाय्याने पोकलेन मशीन खाली काढण्याचा प्रयत्न सुरू झाला. मात्र वजन सहन न झाल्याने पोकलेन मशीन व क्रेन दोन्ही जमिनीवर आदळल्या. यात नुकसान काही कोणाचे झाले नाही परंतु या परिसरात असणारे कामगार हादरून गेले.  सुदैवाने काही झाले नाही. राख तळ्याकडे कोणाचेच नियंत्रण राहिले नसल्याने सर्व काही बेबंदपणा चालू आहे. राख व्यवसायिक  राखेची वाहतूक बेफामपणे करत असून  शहर व परिसरात प्रदूषण वाढले आहे. त्यातच अपघाताच्या घटनाही घडत आहेत.

Web Title: Video Accident while pulling out machine with the help of crane maharashtra beed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.